SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीत स्फोट; हाय अलर्ट जारी

मोहाली :

काल रात्रीच्या सुमारास मोहालीच्या एका इमारतीमध्ये स्फोट झाला. नेमकं काय झालं? कसं झालं? हे लक्षात यायच्या आत दुसरा धक्का असा बसला की, ज्या इमारतीमध्ये स्फोट झाला, ती इमारत मोहालीतील गुप्तचर विभागाची असल्याचे समोर आले आहे. मोहालीतील गुप्तचर विभागाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रॉकेटसदृश्य वस्तू पडल्याची शक्यता व्यक्त होतीये.

Advertisement

या स्फोटामध्ये इमारतीचं तसेच आतमध्ये असलेल्या विविध वस्तूंचे आणि इतर साहित्याचे बरेच मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाली पोलीस घटनास्थळी पोहचले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास रॉकेट सदृश वस्तू इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आदळली आहे. ही वस्तू दुसऱ्या मजल्यावर आदळल्याने दुसऱ्या मजल्यावर मोठा स्फोट झाला आहे. इमारतीच्या काही काचा तुटल्या आहेत. या घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. पोलीस याचा कसून तपास सुरू आहे.

Advertisement

या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. विशेष बाब म्हणजे गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये असा स्फोट झाल्याने संशयाला अनेक दिशा आहेत. पंजाबची राजधानी चंदीगडच्या शेजारीच असणाऱ्या मोहाली शहरात हे घडलं आहे, त्यामुळे मोहालीमध्ये अशी घटना घडणं याला पोलिसांनी गंभीरपणे घेतलं आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी अगदी वेगाने तपासाची सूत्रे हलवली आहे.

Advertisement