SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’ बनवण्याच्या नियमांत केंद्र सरकारकडून मोठे बदल..!

‘ड्रायव्हिंग लायसन्स’… वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. ‘आरटीओ’कडून ठराविक काळासाठी दिलं जाणारं सरकारी प्रमाणपत्र.. हा ठराविक काळ पूर्ण झाल्यावर ‘लायसन्स’चं नूतनीकरण करावं लागतं.. अर्थात ‘ड्रायव्हिंग लायसन्स’शिवाय गाडी चालवताना आढळल्यास तुमच्यावर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते.

तुम्ही जर ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (driving license) बनविण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. मोदी सरकारने ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ बनवण्याच्या नियमांत काही महत्वाचे बदल केले आहेत. अर्थात, त्यामुळे सामान्यांचा फायदाच होणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

असे असतील नवे नियम…
– केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून हे नवे नियम लागू केले जाणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाऊन वाहन चालवण्याचीही टेस्ट द्यावी लागणार नाही.. त्यामुळे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी प्रतीक्षा यादीतील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे.

– लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी ‘आरटीओ’मध्ये परीक्षेसाठीही थांबावे लागणार नाही.. नव्या नियमानुसार, आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुम्हाला ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी नोंदणी करता येईल. संबंधित केंद्रातून ट्रेनिंग घेतल्यानंतर तेथेच परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. ट्रेनिंग सेंटरमधून प्रमाणपत्र देण्यात येईल.

Advertisement

– केंद्रीय मंत्रालयाने ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी आता एक अभ्यासक्रम तयार केला आहे. थिअरी व प्रात्याक्षिक अशा दोन भागात हा अभ्यासक्रम असेल. त्यात लाइट मोटर व्हेईकल (LMV) अभ्यासक्रमाचा कालावधी 4 आठवड्यांचा आहे, जो 29 तास चालेल. रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग, पार्किंग आदी प्रात्याक्षिकांसाठी 21 तास, तर उर्वरित 8 तासांत थिअरी शिकवली जाणार आहे..

ट्रेनिंग सेंटरसाठीही नियम
– दुचाकी, तीन चाकी व हलक्या वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जागा असावी. तसेच अवजड प्रवासी/माल वाहने किंवा ट्रेलरसाठी प्रशिक्षण केंद्राजवळ दोन एकर जागा असावी.
– प्रशिक्षक किमान 12 वी पास असणं आवश्यक. तसेच, त्याला किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.

Advertisement

– ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम थिअरी व प्रात्याक्षिक अशा दोन भागांमध्ये विभागलेला असेल.
–  ट्रेनिंग सेंटरमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा असणं आवश्यक.
– मध्यम व अवजड वाहन मोटार वाहनांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवड्यात 38 तासांचा आहे. थिअरी क्लासचे 8 तास आणि प्रात्याक्षिकाचे 31 तास असणार आहेत.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement