भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) हा भारताचा एक दमदार माजी फलंदाज आणि फिनिशर म्हणून ओळखला जायचा. युवराज सिंहने इंडियाला 2007 आणि 2011 मध्ये दोन्ही वर्ल्डकप जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली. पण आता सक्षम असूनही कर्णधारपद त्याच्यापासून लांब कसं गेलं होतं, याचा त्याने स्वतः खुलासा केला आहे.
भारतीय संघात अनेकदा फिनिशरची आणि अष्टपैलूची भूमिका पार पाडल्यानंतर युवराज सिंह IPL मध्ये पंजाब संघाचा कॅप्टन झाला होता. पण त्यात त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. पण दुसरीकडे टीम इंडियासाठी त्याने खूप मोठं योगदान दिलं आहे.
युवराज धोनीबाबत काय म्हणाला..?
युवराज सिंह संजय मांजरेकरांशी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, मी टीम इंडियाचा कॅप्टन होणार होतो. पण तेव्हाच सचिन तेंडुलकर व ग्रेग चॅपल यांच्यात वाद झाला. त्यावेळी सचिन किंवा ग्रेग चॅपेल असं निवडण्याची वेळ होती. मग मी या वादामध्ये माझ्या सहकाऱ्याला म्हणजेच सचिनला निवडत उघडउघडपणे पाठिंबा दिला आणि असं करणारा मी माझ्या संघातील एकटाच खेळाडू होतो. बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना मात्र हे आवडलं नाही. मग त्यानंतर गोष्टी वेगाने बदलल्या”, असं युवराज म्हणाला.
पुढे तो म्हणाला, “माझ्या कानावर आलेल्या गोष्टी किती खऱ्या ते मला माहिती नाही. पण त्यानंतर एक विचित्र गोष्ट घडली. मी उपकर्णधार होतो तेव्हा मला अचानक त्या पदावरून दूर करण्यात आलं. वीरेंद्र सेहवाग संघासोबत नसल्यानं 2007 मध्ये झालेल्या T-20 Worldcup साठी महेंद्रसिंह धोनीला भारताचा कर्णधार देण्यात आलं. जेव्हा सर्व वरिष्ठ खेळाडूंनी टी-20 विश्वचषकातून आपलं नाव मागे घेतलं होते, तेव्हा युवराज भारतीय संघाचा कॅप्टन बनण्याची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही”, असं युवराज सिंहने सांगितले.
तरीही धोनीचं केलं कौतुक…
युवराज सिंग पुढे म्हणाला, ‘काही दिवसांनी मला वाटले की, धोनी एक कॅप्टन म्हणून खरोखरंच चांगली कामगिरी करत आहे. वन-डे सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो कदाचित योग्य व्यक्ती होता. त्यानंतर मला खूप दुखापत होत असल्याने मी वारंवार संघाबाहेर राहत असे. मी कॅप्टन झालो असतो तरी मला यामुळे संघाबाहेर जावे लागले असते. म्हणून ‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’. कर्णधार न झाल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. मला याविषयी काहीच खंत नाही, पण मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमीच पाठिंबा देईन”, असंही युवराज सिंग म्हणाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy