SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एलॉन मस्क यांच्या ‘या’ ट्विटमुळे जगात खळबळ..!

टेस्लाचे मालक, उद्योजक एलॉन मस्क आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे खास किंवा प्रोफेशनल अपडेट्स देत प्रत्येक ट्विटमुळे ट्विटवर आजकाल चर्चेत येत आहेत. कधी ते कोका-कोला विकत घेण्याबद्दल बोलतात तर कधी ट्विटरचे भविष्य कसे असेल याबद्दल अपडेट देतात.

ट्विटर (Twitter) कंपनी खरेदी केल्यापासून जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) आता आणखी एका ट्विटमुळे चर्चेत आलं आहे. मस्क यांनी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांच्या संशयास्पदरित्या मृत्यू होण्याच्या अंदाजाबाबत लिहिलं आहे. या ट्विटवर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Advertisement

काय होतं ते ट्विट..

Elon Musk यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘जर संशयास्पद परिस्थितीत माझा मृत्यू झाला, तर हे nice knowin ya असेल.’ Elon Musk यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ आहे तरी काय, हे स्पष्टपणे कुणालाही समजलेला नाही. कारण त्यांचे अनेक ट्विट हे कोड्यात असतात. मात्र, मस्क यांनी या ट्विटमध्ये ‘Nice Knowin Ya’ या गाण्याचा उल्लेख करत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

Advertisement

एलॉन मस्क यांच्या ‘If I die under mysterious circumstances, it’s been nice knowin ya’ या ट्विटवर ट्विटर यूजर्स त्यांच्या समजुतीनुसार कमेंट करत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले, “नाही, तुम्ही मरणार नाही. जगाला तुमची गरज आहे”, असं म्हटलं आहे.

मस्क यांचे हे ट्विट कमी वेळेत जास्त व्हायरल होऊन फक्त तीन तासांच्या आतमध्ये 40 हजारहून अधिक लोकांनी ते रीट्विट केले आहे. मस्क यांनी केलेलं प्रत्येक ट्विट काही घडामोडी घडण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. असं म्हणतात की त्यांना इतर कंपन्या, शेअर बाजार यांवर परिणाम नाही होऊ यासाठी परवानगी देखील घ्यावी लागते, अशी माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement