SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जमिनीच्या मोजणीबाबत मोठी ब्रेकींग!

शेतकरी आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज करतात. शेतकऱ्यांची प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे काही महिने प्रलंबित राहतात. मात्र आता महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनींची मोजणी काही मिनिटांत करणार आहे.

एक हजार रोव्हर मशीन्स खरेदीसाठी निविदा अंतिम टप्प्यात असून मे महिन्याखेरीस त्या पूर्ण होतील. तर राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला या खरेदीसाठी तब्बल 80 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे, भूमी अभिलेख विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहीती दिली आहे.

Advertisement

काय आहे नवीन यंत्रणा…?

भूमि अभिलेख कार्यालयाने असा दावा केला आहे की, या मशीनद्वारे 1 हेक्टर क्षेत्राची मोजणी फक्त 30 ते 60 मिनिटांत होऊ शकते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे. जमीन मोजणीकरीता रोव्हर मशिनचा वापर करून आता दिवसातून 5 ते 6 जमिनींची अचूक मोजणी तीदेखील काही वेळेतच करता येणे शक्य होणार आहे. तब्बल 1,000 जमीन मोजणी यंत्रे भूमि अभिलेख विभागाला मे महिन्याच्या शेवटी प्राप्त होणार आहेत.

Advertisement

या पद्धतीने जर जमिनीची मोजणी करायची असेल तर मोजणीकरीता रोव्हर मशिन हे जीपीएस बेस टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने कार्य करेल. त्यामुळे जमिनीची मोजणी करणं आता लवकर पूर्ण होणार आहे. राज्यातील भूमी अभिलेख विभागाला रोव्हर मशिन्स उपलब्ध झाल्यास राज्यातील सर्व प्रकरणांचा त्वरीत निपटाला करण्यात येणार आहे. या यंत्रांमुळे प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला सरासरी 2000 ते 2200 जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढता येईल, असं समजतंय.

रोव्हर मशीनने उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या सिग्नलद्वारे जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या मदतीने 77 स्थानके (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स) तयार केली आहेत. या स्थानकांच्या आधारे जीपीएस (GPS) मोजणी काही वेळेमध्ये पूर्ण होणार आहे. या स्थानकांमधून होणारी मोजणी रोव्हरमध्ये संकलित झाल्यावर ती पडद्यावर (टॅब) आकडेदेखील दाखवू शकेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement