SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सिलिंडरवर मिळतो मोफत ‘इन्शुरन्स’; दुर्घटनेनंतर मिळते ‘इतकी’ नुकसान भरपाई..?

घरातील सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे, गॅस सिलिंडर.. केंद्र सरकारने नवीन गॅस कनेक्शन देण्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे.. मात्र, नवीन गॅस कनेक्शन घेताना बऱ्याच लोकांना महत्वाची गोष्ट माहिती नसते. ती म्हणजे गॅस सिलिंडरवर दिला जाणारा ‘इन्शुरन्स कव्हर’..!

नवे कनेक्शन घेतानाच गॅस कंपनीकडून विमा पॉलिसी दिली जाते.. भारत गॅस (Bharat Gas), इंडेन गॅस (Indane Gas) व एचपी गॅस (HP Gas) या तिन्ही कंपन्या ग्राहकांना विमा पाॅलिसीची सुविधा देतात. विशेष म्हणजे, विमा पाॅलिसीच्या प्रीमियमसाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करण्याची गरज नसते. गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास ग्राहकांना ‘इन्शुरन्स क्लेम’ करता येतो..

Advertisement

गॅस सिलिंडरमुळे एखादी दुर्घटना झाली, तर ग्राहकांना ‘थर्ड पार्टी विमा संरक्षण’ दिले जाते. गॅसमुळे झालेल्या कोणत्याही अपघातासाठी संबंधित गॅस कंपनी ग्राहकांना विमा संरक्षण देत असते. याबाबतची माहिती ‘इंडियन ऑइल’च्या वेबसाइटवर देण्यात आलीय..

किती भरपाई मिळते..?

Advertisement

गॅस सिलिंडरच्या अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना 6 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते, तर अपघातात जखमी झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंत क्लेम मिळू शकतो. सोबतच अधिकृत ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास 2 लाखांपर्यंतचा विम्याचा दावा करता येतो. मालमत्तेच्या नुकसानीच्या बदल्यात ही भरपाई मिळते.

तुमच्या घरात एलपीजी गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास, तुम्ही सर्वप्रथम तुमच्या गॅस कंपनीच्या ‘डिस्ट्रिब्युटर’ला कळवावे. ‘डिस्ट्रिब्युटर’कडून या प्रकरणाची चौकशी केली जाते. त्यानंतर ते विमा कंपनीला याबाबत माहिती देतात.. नंतर कंपनी अपघातानुसार ग्राहकाला नुकसान भरपाई देत असते..

Advertisement

आवश्यक कागदपत्रे

  • अपघाती मृत्यूचे प्रमाणपत्र.
  • पोस्टमॉर्टम रिपोर्ट.
  • तपासणी अहवाल
  • रुग्णालयात दाखल करण्याचे प्रिस्क्रिप्शन.
  • मेडिकल बिल.
  • रुग्णाचे डिस्चार्ज कार्ड.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement