SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता FASTag विसरा, मोदी सरकार सुरू करणार ‘ही’ नवीन टोल सिस्टम

टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस तसेच झटपट व्हावा आणि तोल नाक्यांवर होणारी चारचाकी वाहनांची गर्दी कमी व्हावी या उद्देशाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून वाहन चालकांना ‘फास्टॅग’ FASTAG बंधनकारक करण्यात आले होते.

स्प्रेडइट न्यूज

नवी दिल्ली – FASTag मागील वर्षीच सरकारने सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag अनिवार्य केलं होतं. FASTag हा वाहन चालवताना पेमेंट करण्याचा एक भविष्यातला सोपा मार्ग आहे असं सरकारने ही प्रणाली लागू करताना म्हटलं होतं. दरम्यान, काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, FASTag चा वापर पेट्रोल पंप आणि पार्किंगच्या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

Advertisement

आता घरबसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा तुमच्या PF खात्यातील रक्कम

विशेष म्हणजे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस तसेच झटपट व्हावा आणि तोल नाक्यांवर होणारी चारचाकी वाहनांची गर्दी कमी व्हावी या उद्देशाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून वाहन चालकांना ‘फास्टॅग’ FASTAG बंधनकारक करण्यात आले होते. खरं तर फास्टॅग प्रणालीचा अवलंब करण्यास नागरिकांना वेळ लागला होता. असं असतानाच आता भारत सरकार लवकरच ही प्रणाली बंद करणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकार सध्या जीपीएस आधारित टोल टॅक्स कलेक्शन सिस्टम सुरू करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी देखील जीपीएस आधारित टोल टॅक्स कलेक्शन संदर्भात माहिती दिली होती. मात्र, याबाबत सरकार सध्या गांभीर्याने विचार करत आहे.

Advertisement

रासायनिक खतांच्या किंमती जाहीर; मोदी सरकारच्या योजनेमुळे शेतकऱ्यांचा होणार फायदा..!

आता भारत सरकार FASTAG ऐवजी ही नवी प्रणाली लवकरच लागू करणार असल्याचं म्हटलं जातंय. स्टेट्समनच्या अहवालानुसार, भारत सरकार टोल टॅक्स कलेक्शन (TAX Collection) या प्रणालीची भारतीय महामार्गांवर आधीपासूनच चाचणी करत आहे. मात्र, पायलट प्रोजेक्ट म्हणून ही नवीन यंत्रणा नेमकी कुठे कार्यरत होत आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Advertisement

नवीन जीपीएस (GPS) यंत्रणा कशी काम करेल?

GPS आधारित टोल संकलन प्रणाली किंवा टोल कलेक्शन सिस्टमअंतर्गत, महामार्गांवरील अंतरानुसार ग्राहकांना टोल भरावा लागेल. नवीन कायदे प्रमाण जे असेल त्यानुसार वाहनधारकांना टोल आकारले जातील. म्हणजेच, तुम्ही जितके जास्त महामार्ग वापराल तितका जास्त टोल टॅक्स तुम्हाला भरावा लागेल.

Advertisement

गाय व म्हशीच्या अनुदानात राज्य सरकारकडून मोठी वाढ..पशूपालकांना मिळणार ‘इतके’ पैसे..!

युरोपीय देशांमध्ये यशस्वी प्रणाली

Advertisement

टोल नाक्यांवर टप्याटप्याने टोल वसूल केला जातो. मात्र अनेक युरोपीय देशांमध्ये आधीपासूनच GPS आधारित टोल संकलन प्रणाली कार्यरत आहे. विशेष म्हणजे विदेशात ही नवीन GPS सिस्टीम यशस्वी असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान, युरोपियन देशांमध्ये मिळालेल्या मोठ्या यशामुळे, भारत सरकार भारतीय रस्त्यांवर देखील हीच प्रणाली लागू करण्यात यावी यासाठी आग्रही आहे.

कशी काम करते GPS प्रणाली

Advertisement

नवीन GPS आधारित टोल कलेक्शन सिस्टम रोडवर वाहन चालवताच प्रवासाची नोंद करण्यास सुरुवात करते. कोणत्याही महामार्गांवरुन गाडी बाहेर पडल्यानंतर GPS सिस्टिम काम करायची थांबते. याशिवाय, एक्स्प्रेस वेवर (Express Way) प्रवास केलेल्या किलोमीटरच्या आधारे टोलची रक्कम आता भरावी लागेल.

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता हातात पैसा खुळखुळणार

जीपीएस आधारित टोल कलेक्शन सिस्टम टोल रोडवर गाडी चालवताच प्रवासाची नोंद करण्यास सुरुवात करते. गाडी महामार्गांवरुन बाहेर पडल्यावर ती थांबते. एक्स्प्रेस वेवर प्रवास केलेल्या किलोमीटरच्या आधारे टोल भरावा लागेल.

Advertisement

दरम्यान, सध्याच्या काळात काही पेट्रोल पंप FASTag पेमेंट स्वीकारू लागले होते. तरीही ही संकल्पना फारशी लोकप्रिय ठरू शकली नाही. काही प्रमाणात ही संकल्पना अयशस्वी ठरली असं म्हणता येईल. NHAI अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, रोख व्यवहार ही कायदेशीर निविदा आहे. भारतात मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार केले जातात, म्हणूनच ते वाहन धारकांना रोख रक्कम अजिबात नाकारू शकत नाहीत.

घरगुती गॅस आता ‘इतक्या’ रुपयाने महागला

Advertisement