SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इलेक्ट्रिक स्कूटर्सला आग लागण्याच्या घटना, सरकार घेणार धक्कादायक निर्णय..

भारतात नव्याने सुरू झालेल्या ईव्ही मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून ई-स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालंय. इलेक्ट्रिक वाहनांवरील आता लोकांचा विश्वास कमी होत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमुळे केंद्र सरकारने याचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल आला आहे.

आजपर्यंत प्राप्त माहीतीनुसार, देशात तीन प्युअर ईव्ही, एक ओला, तीन ओकिनावा आणि 20 जितेंद्र ईव्ही स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्‍या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न समोर येत आहे.

Advertisement

केंद्रीय समितीच्या अहवालात काय…?

ओकिनावा ऑटोटेक, बूम मोटर, प्युअर ईव्ही, जितेंद्र ईव्ही आणि ओला इलेक्ट्रिकच्या ई-स्कूटर्समधील इलेक्ट्रिक गाड्यांमधील आग आणि बॅटरी स्फोटांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अहवालाच्या आधारे दोषी कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) आगीची चौकशी करणाऱ्या समितीला प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी सेल किंवा डिझाइनमध्ये दोष आढळले आहेत. स्कूटर्सना आगी लागल्याच्या घटना पाहता केंद्र सरकार या वाहनांच्या उत्पादकांवर बॅटरीचा दर्जा सुधारण्यासाठी दबाव आणू शकते. यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर होणार आहेत.

तेलंगणामध्ये झालेल्या बॅटरीच्या स्फोटासोबतच इतर जवळपास सर्व इलेक्ट्रिक कंपन्यांच्या वाहनांच्या आगींमध्ये बॅटरी सेल तसेच बॅटरी डिझाइनमध्ये दोष आढळून आले आहेत, एका वृत्तसंस्थेनेही सूत्रांच्या हवाल्याने ही माहीती दिली आहे. ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधून उपाय सुचवणार आहेत.

Advertisement

दरम्यान अलीकडेच इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी विमा संरक्षण (E-Bike Insurance, Two Wheeler insurance) बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सध्या केंद्र आणि दिल्ली सरकारला एक नोटीस पाठवली आहे. विमा संरक्षणाशिवाय या दुचाकींना आग लागण्याच्या घटनांना जवजवळ बंद करण्यासाठी ईव्ही उत्पादकांद्वारे वाहनामध्ये चांगल्या प्रतीची, दीर्घकाळ टिकाऊ बॅटरी देण्याची मागणी केली गेली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement