SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्लू आधार कार्ड आहे ‘त्या’ वयोगटासाठी आवश्यक; वाचा, संपूर्ण माहिती सिंगल क्लिकवर..

आधारकार्ड आता आपल्या दैनंदिन जीवनाचा आधार बनत चालला आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यालयीन किंवा खाजगी कामासाठी आधार कार्ड अतिशय महत्वाची गोष्ट बनले आहे. आधार हे सर्वात मोठी बायोमेट्रिक व्यक्तिपरिचय योजना आहे. भारतीय रहिवाशांसाठी असलेल्या या योजनेचे नियंत्रण यूआयडीएआय प्राधिकरणामार्फत केले जाते.

देशातील प्रत्येक व्यक्तीला आपली ओळख महत्वाची आहे . अगदी नवजात बालकाला देखील. त्यामुळेच
आता नवजात बालकाला देखील आधार कार्ड अनिवार्य आहे. शासकीय योजनांचा लाभ, शाळेत प्रवेश मिळणे यासाठी हे आधार कार्ड गरजेचे आहे.

Advertisement

ब्लू आधार कार्ड आहे तरी नक्की काय :-

5 वर्षाखालील लहान मुलांना आधार कार्ड काढून घेणे शासनाने सक्तीचे केले आहे. पाच वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डवर निळ्या रंगाच्या अक्षरात छपाई केलेली आहे. त्यामुळे त्याला ब्लू आधार म्हणतात. ब्लू आधारला बाल आधार ( Baal Aadhaar) असंही म्हणतात.

Advertisement

वयाची अट :-
भारतातील कोणताही व्यक्ती आधार कार्डसाठी नोंदणी करू शकते. नवजात बालक आधार कार्डसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. ब्लू आधार ५ वर्षाखालील मुलांसाठी असते.

आवश्यक कागदपत्रे:-ब्लू आधार कार्ड साठी बर्थ सर्टिफिकेट (Birth Certificate) आणि पालकांपैकी एकाचं आधार कार्ड आवश्यक आहे. कारण, लहान मुलांचा आधार क्रमांक पालकांपैकी एकाच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असतो.

Advertisement

पालकाच्या आधार कार्डच्या आवश्यकता का असते :-

पाच वर्षांखलील मुलांच्या आधार कार्डसाठी बायोमेट्रिक्स कॅप्चर केले जात नाहीत. पालकांचा डेमोग्राफिक डेटा (Demographic Data) आणि त्यांच्या यूआयडीशी जोडलेली चेहऱ्याची प्रतिमा वापरून मुलांचा यूआयडी प्रोसेस केला जातो. जेव्हा मूल पाच आणि 15 वर्षांचं होईल तेव्हा त्याला त्याचे बायोमेट्रिक्स (Biometrics) अपडेट करावे लागतील.

Advertisement