बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाला बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं. कारण आयुष्मान खुराना हा अतिशय वेगवेगळे विषय, सामाजिक विषयावर भाष्य करणारे सिनेमे करतो. त्याने एक ना एक बडे सिनेमे साईन करून त्यांना हिट करून दाखवलं आहे. आयुष्मानने वेगवेगळे रोल करत त्याच्या प्रत्येक चित्रपटाला तगडी कमाई करत एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे.
अनेक दिवसांपासून अभिनेता आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट ‘अनेक’ची सोशल मीडियावर चर्चा होती. कारण या चित्रपटात देखील त्याने एका सामाजिक मुद्दयावर अभिनय केला आहे. त्याने पहिल्यांदा एका अंडर कव्हर पोलीस ऑफिसरची भूमिका केली आहे. ‘आर्टिकल 15’ सिनेमानंतर त्यांच्या या धाटणीच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होतेय.
आयुष्मान पहिल्यांदा एका अंडर कव्हर पोलीस ऑफिसरच्य रुपात दिसणार असल्यामुळे या सॉफ्ट हार्ट समजल्या जाणाऱ्या अभिनेत्याला ‘अनेक’ या सिनेमातील स्टोरीला कसा रंग देता येईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ‘अनेक’चा ट्रेलर पहिला तर आपल्याला दिसून येईल की, आयुष्मान खुराना शत्रूसोबत लढत आहे आणि दारूगोळा आणि युद्धजन्य भागात बंदुक घेऊन भिडत आहे. आयुष्मानच्या दमदार डायलॉग्सने ट्रेलरमध्ये जीव ओतला आहे.
“इंडिया इंडिया इंडिया. मैं इसी इंडिया की सुरक्षा के लिए काम करता हूं नॉर्थ ईस्ट में..” हा त्याचा डायलॉग सर्वांची मनं जिंकून घेतो. ‘आर्टिकल 15’ या चित्रपटात पोलिस बनल्यानंतर, आयुष्मान ईशान्येतील अनेक भागात गुप्त पोलिस बनणे आणि तेथील लोकांना भेडसावणाऱ्या भेदभावासारख्या गंभीर समस्या सोडवताना दिसणार आहे.
भारताच्या नॉर्थ ईस्ट भागात राहणाऱ्या लोकांसोबत होणारा भेदभाव, त्यांना हिणवलं कसं जातं आणि देशाची सुरक्षा यावर हा सिनेमा दाखवला जाणार आहे. ‘अनेक’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरीज आणि अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. 2019 च्या ‘आर्टिकल 15’ चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत आयुष्मानचा हा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट 27 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy