SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ बिझनेसमधून होईल दरमहा बंपर कमाई, सरकारकडून मिळेल मदतीचा हात..

नोकरीपेक्षा स्वत:चा छोटा का असेना ना, पण उद्योग-धंदा बरा, असं आजच्या काळात अनेकांना वाटतं.. व्यवसायात आपण स्वतःच स्वत:चे बॉस असताे, आपले स्वतःचे नियम असतात, प्रश्न विचारणारा कोणी नसतो. आपल्या ब्रँडच्या जोरावर स्वत:ची वेगळी निर्माण करता येते.. तसं नोकरीत नसतं..

व्यवसाय करायचा म्हटलं, म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं भांडवल.. जोखीम घेतल्याशिवाय धंद्यात उतरता येत नाही.. अपूरं भांडवल असल्यास, बॅंका कर्ज देतात. विविध योजनांद्वारे सरकार मदतीचा हात देतं.. तुम्ही कमी पैसे गुंतवूनही बिझनेस सुरू करु शकता.. त्याद्वारे महिन्याला लाखो रुपये कमावू शकता. अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेऊ या..

Advertisement

‘हा’ व्यवसाय करा सुरु..!

सकाळी अंघोळ करण्यासाठी सर्वात आधी आपण शोधतो, ती साबण.. ही बाराही महिने रोज लागणारी गोष्ट आहे.. तुम्हालाही साबणाची फॅक्टरी (Soap Factory) सुरू करता येईल. विशेष म्हणजे, त्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो. साबण तयार करण्याचा कारखाना काढून हा व्यवसाय सुरू करता येईल.

Advertisement

साबणाची फॅक्टरी सुरु करण्यासाठी 4 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक लागते.. केंद्र सरकारच्या ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत तुम्हाला हा बिझनेस सुरू करण्यासाठी सहज 80 टक्के लोन (Loan) मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला पूर्ण बिझनेसचा प्रॉजेक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो. 7 महिन्यांत ही सगळी औपचारिकता पूर्ण झाली, की तुम्ही थेट उत्पादन सुरू करू शकता.

मुद्रा योजनेच्या प्रॉजेक्ट प्रोफाइल रिपोर्टनुसार, तुम्ही वर्षाला एकूण 4 लाख किलो साबण उत्पादन करू शकता. बाजारात त्याची एकूण किंमत सुमारे 47 लाख रुपये असेल. उत्पादन खर्च, लोन किंवा इतरांकडून घेतलेले पैसे परत केल्यानंतरही तुमच्या खिशात वर्षाला किमान 6 लाख रुपये शिल्लक राहू शकतात नफा होईल.

Advertisement

आवश्यक गोष्टी

  • साबणाची फॅक्टरी सुरु करण्यासाठी एकूण 750 स्क्वेअर फूट जागा लागेल. पैकी 500 स्क्वेअर फूट कव्हर करण्यात येणार असून, उर्वरित जागा मोकळी लागेल.
  • तसेच मशिन्ससह एकूण 8 उपकरणं लागतील. मशिन्स आणि त्यांच्या फीटिंगचा एकूण खर्च एक लाख रुपयांपर्यंच जाईल.

मुद्रा योजनेबाबत…
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना परवडणाऱ्या दरांत कर्ज देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) सुरु केली. या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देतं. त्यासाठी प्रोसेसिंग फीसुद्धा घेतली जात नाही. या योजनेअंतर्गत किमान व्याजदर 12 टक्के आहे.

Advertisement

 

Advertisement