SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती चिंताजनक.. जेजे रुग्णालयात उपचार सुरु..!

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांना ‘ईडी’ने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘ईडी’ने विशेष ‘पीएमएलए’ कोर्टात नुकतेच मलिक यांच्याविरुद्ध तब्बल 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे.

यादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तुरुंगात पडल्याने नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून, आज (ता. 2) त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मलिक यांच्या वकिलांनी विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाला दिली.

Advertisement

Advertisement

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मलिक यांनी विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या जामीन अर्जाला ‘ईडी’ने तिव्र विरोध केला. त्यावर विशेष न्यायालयाने ‘ईडी’ला मलिक यांचा ‘हेल्थ रिपोर्ट’ सादर करण्याची सूचना केली. आता या प्रकरणावर 5 मे रोजी सुनावणी होणार आहे..

दरम्यान, विशेष न्यायालयाने मलिक यांना भेटण्यासाठी त्यांची मुलगी निलोफर समीर खान यांना परवानगी दिली आहे.. मलिक यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला
दरम्यान, याआधीही मलिक यांचा तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुटकेची मागणी करताना मलिक म्हणाले होते, की ‘पीएमएलए’ कायदा 2005 चा आहे. मात्र, त्यांना 1999 मधील व्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला.. तपासाच्या या टप्प्यावर आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. अशा स्थितीत योग्य न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती.. दुसरीकडे त्याचवेळी ‘पीएमएलए’ न्यायालयाने मलिक यांची न्यायालयीन कोठडी 6 मेपर्यंत वाढवली. त्यामुळे मलिक यांच्यापुढील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement