मुंबई :
Xiaomi कंपनी भारतात एमआय (MI) आणि रेडमी (Redmi) या नावाने स्मार्टफोनचा व्यवसाय करते. शनिवारी केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना ईडीने सांगितले की, Xiaomi India ही चीनस्थित Xiaomi समूहाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये चीनी फर्मने परदेशात पाठवलेल्या कथित बेकायदेशीर रकमेच्या संदर्भात कंपनीविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती. यानंतर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) संबंधित कलमांतर्गत खात्यांमधील ठेवी जप्त करण्यात आल्या आहेत.
अमलबजाणी संचालनालयाने (ED) स्मार्टफोन निर्माता चीनी कंपनी Xiaomi वर मोठी कारवाई केली आहे. ED ने शाओमी इंडिया प्राइवेट लिमिटेडच्या (Xiaomi India Pvt Ltd) बँक खात्यांमध्ये जमा असलेले 5551.27 कोटी रुपये जप्त (Xiaomi’s bank accounts seized) केले आहेत. शनिवारी ईडीने ही कारवाई केली आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात कंपनीने केलेल्या फसवणुकीप्रकरणी विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 अंतर्गत ही कारवाई केली आहे.
ED ने आपल्या निवेदनात म्हटले की Xiaomi India ने मोबाईल फोनचे उत्पादन आणि वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे, मात्र या तीन परदेशी कंपन्यांकडून कधीही सेवा घेतली नाही. परंतु या कंपन्यांना पैसे नक्कीच पाठवले गेले. कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम परदेशात पाठवली हे फेमाच्या कलम 4 चे थेट उल्लंघन आहे. कंपनीकडून परदेशात पैसे पाठवण्याबाबत बँकांना चुकीची माहितीही देण्यात आली होती, असे देखील ईडीने म्हटले आहे.
भारतात Mi ब्रँडसह करत आहे व्यवसाय कंपनी Mi ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोनचा व्यवसाय करते. शनिवारी केलेल्या कारवाईची माहिती देताना, ईडीने सांगितले की, Xiaomi India ही चीनस्थित Xiaomi समूहाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. एजन्सीने सांगितले की, फेब्रुवारी 2022 मध्ये चीनी फर्मने परदेशात पाठवलेल्या कथित बेकायदेशीर रकमेच्या संदर्भात कंपनीविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती. यानंतर, खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या संबंधित कलमांतर्गत जप्त करण्यात आली आहे.
2015 पासून सुरुवात केली पैसे पाठवायला अहवालानुसार, Xiaomi इंडियाने 2014 मध्ये देशात आपले कामकाज सुरू केले आणि 2015 पासून पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने तीन विदेशी कंपन्यांना रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले. या कंपन्यांमध्ये Xiaomi ग्रुपच्या एका घटकाचे नाव देखील समाविष्ट आहे. रॉयल्टीच्या नावावर ही मोठी रक्कम शाओमी ग्रुपच्या संस्थांच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती, तर इतर दोन कंपन्या अमेरिकन होत्या.