SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे व्यवहार, ‘या’ मोठ्या कंपन्यांनी छोट्या कंपन्यांना ‘एवढ्या’ रुपयांना घेतलं होतं विकत..

जगात सध्या टेक कंपन्यांचे वारे घुमत आहे. जो-तो अशा कंपन्यांत नोकरीसाठी जीव तोडून मेहनत करत असतो. कारण नोकरी करायचं म्हटलं तर अशा टेक कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराची, मोठ्या पॅकेजेसची नोकरी मिळत असते. अशा कंपन्यांनी काही मोठे अ‍ॅप्स आणून सामान्य लोकांच्या जीवनाला काहीसं कंट्रोल देखील केलं आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा कंपन्या आपल्या आकर्षक Apps, Website, जगभरात असलेलं त्यांचं जाळं याच्या जोरावर भरपूर भांडवल करतात. पैसा कमवून त्या इतर लहान कंपन्यांना खरेदी करतात. व्यावसायिक क्षेत्रातही मोठ्या कंपन्या लहान कंपन्यांना आपल्यात विलीन करून घेतल्याचं आपण पाहिलं असेलच. याचं अलीकडेच Tesla आणि SpaceX चे मालक एलॉन मस्क यांनी 44 दशलक्ष डॉलरला ट्विटर खरेदी केल्याची चर्चा तुम्ही ऐकलीच असेल.

Advertisement

बड्या कंपन्या लहान कंपन्यांना करत आहेत खरेदी..

इन्स्टाग्राम: फेसबूकने (facebook) 2012 साली इन्स्टाग्रामला 1 अब्ज डॉलरला विकत घेतलं. म्हणजेच 76 अब्ज 56 कोटी 91 लाख 50 हजार रुपये एवढ्या किंमतीला हा व्यवहार झाला.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप: फेसबूकने व्हॉट्सअ‍ॅपला (whatsapp) 2014 साली 19 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1 हजार 456 अब्ज 65 कोटी 30 लाख 50 हजार रुपयांमध्ये खरेदी केलं आहे.

टम्बलर: Tumblr हे समाजमाध्यम संकेतस्थळ Yahoo! ने 2013 साली 1.1 अब्ज डॉलरमध्ये म्हणजेच 84 अब्ज 21 कोटी 61 लाख 65 हजार रुपयांत खरेदी केलं होतं.

Advertisement

क्वेस्ट सॉफ्टवेअर: Dellने क्वेस्ट 2012 साली सॉफ्टवेअर या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीला 2.4. अब्ज डॉलरला म्हणजेच 183 अब्ज 83 कोटी 41 लाख 20 हजार भारतीय रुपयांत खरेदी केलं होतं.

नोकिया: Microsoft ने टेलीकम्युनिकेशन कंपनी Nokia च्या मोबाइल फोन युनिटला 2014 साली 7.2 अब्ज डॉलर म्हणजेच 551 अब्ज 84 कोटी 76 लाख रुपयांना खरेदी केले होते.

Advertisement

स्काइप: मायक्रोसॉफ्टने स्काइपला 2011 साली 8.5 अब्ज डॉलर्सना म्हणजे 651 अब्ज 14 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले होते.

मोटोरोला मोबीलिटी: जवळजवळ सर्वांनाच परिचित असणाऱ्या Google कंपनीने Motorola Mobilityला 12.5 अब्ज डॉलर्सना खरेदी केले होते.

Advertisement

Red Hat: जगविख्यात IBMने Red Hat या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीला 2019 साली 34 अब्ज डॉलर म्हणजेच 2 हजार 605 अब्ज 35 कोटी 37 लाख रुपयांना विकत घेतले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement