SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, अवघ्या महिन्यात व्हाल लखपती..!

सध्या नोकरीऐवजी व्यवसायाला अनेक जण प्राधान्य देताना दिसतात.. एक तर नोकरीपेक्षा व्यवसायातून पैसा अधिक मिळवता येतो. शिवाय व्यवसायात प्रगतीच्या अमर्याद संधी असतात. बिझनेस म्हणजे, आपण आपल्या मनाचे राजे. कोणाची चाकरी करावी लागत नाही..

कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हटलं, की समोर पहिला प्रश्न उभा राहतो.. भांडवलाचा..! अनेक जण व्यवसाय सुरू करण्याचा विचार तर करतात. पण त्यांची गाडी भांडवलाजवळ येऊन अडते.. मात्र, व्यवसाय करण्यासाठी खूप सारा पैसाच हवा, असं काही नाही.. कमी खर्चात चांगला नफा देणाराही व्यवसायही तुम्ही करु शकता.. अशाच एका व्यवसायाबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

नव्या व्यवसायाबाबत…
लहान-थोरांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे, वेफर्स.. अगदी कमी खर्चात, कमी जागेत तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. फक्त बटाटाच नव्हे, तर अगदी केळी, गाजर, रताळे, बीट नि पपईपासूनही वेफर्स बनवले जातात आणि त्याला बाजारात बारमाही मोठी मागणीही असते.

वेफर्सच्या व्यवसायात मोठ्या कंपन्यांची नावे दिसत नाहीत. त्यामुळे तुमची स्पर्धा ही स्थानिक उत्पादकांशीच असणार आहे.. पण जर तुम्ही वेफर्सची टेस्ट नि क्वालिटी चांगली दिली, तर काही दिवसांत लखपती होऊ शकाल..

Advertisement

किती खर्च येईल..?
साधारणपणे, सुमारे 100 किलो वेफर्स तयार करण्यासाठी फक्त 5 ते 7 हजार रुपये खर्च येतो. अनेकदा भाजीपाला, फळभाज्यांच्या किंमती वाढल्यास हा खर्च मागे-पुढे होऊ शकतो.. तुम्ही स्वतःच्या घरातही वेफर्स बनवण्याचे काम करु शकता.. त्यामुळे जागेसाठीही खर्च करावा लागणार नाही..

अर्थात तुमची कंपनी सुरू करण्यापूर्वी व्यवसायाची नोंदणी, जीएसटी रजिस्ट्रेशन व इतर आवश्यक गोष्टी कराव्या लागतील. बटाटा, गाजर, बीट असा कच्चा माल लागेल. भाज्या कापण्यासाठी, धुण्यासाठी, मिक्सिंगसाठी मशिनची गरज लागेल.. पॅकेजिंग व प्रिंटिंगसाठी मशीन घ्याव्या लागतील. मात्र, हा सगळा सुरुवातीलाच आहे.

Advertisement

कमाई किती होईल..?
साधारणपणे 100 किलो वेफर्स बाजारात 15,000 रुपयांपर्यंत विकले जाऊ शकतात. तुम्ही रोज 50-60 किलो वेफर्स बनवल्यास रोज 7,500-8,500 रुपये कमाई होईल.. सगळा खर्च वजा जाता तुम्ही रोज 5-6 हजार रुपये नफा मिळवू शकता.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement