SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रातील ‘हे’ शहर ठरले जगातले पाचव्या क्रमांकाचे उष्ण ठिकाण; ‘या’ 4 जिल्ह्यांनाही बसणार उन्हाचा झटका

चंद्रपूर :

राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात सध्या उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाच ते सहा दिवस उन्हाचा तडाखा असाच राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच 2 दिवसांपूर्वी हवामान खात्याने चार ते पाच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज दिला होता, तो आता खरा ठरताना दिसत आहे.

Advertisement

तसेच आता कोकणासह अखंड महाराष्ट्र तापताना दिसत आहेत. अशातच महाराष्ट्राच्या नवे आणखी एक उष्णतेचे रेकोर्ड नोंदवले गेले आहे. यावर्षी पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात चंद्रपूर शहरात 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशाच्या उत्तर, उत्तर-पश्चिम आणि मध्य भागातील सर्वच राज्यांमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. त्याचा परिणाम म्हणून अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणखी एक दिवस उष्णतेची लाट तीव्र राहणार असून, पुढील पाच दिवस लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

या सगळ्या उष्ण वातावरणात आपण थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि दुपारी शक्यतो घरीच किंवा ऑफिसमध्ये थांबावे, थेट उन्हाच्या संपर्कात येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय :- 

Advertisement

वेगवेगळ्या देशांत तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार उष्णतेचे वेगवेगळे निकष असू शकतात. भारतात समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.

Advertisement