SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरीतील ‘ओबीसी’ आरक्षणाबाबत मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधील ‘ओबीसी’ आरक्षणाबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे. आगामी काळात या निर्णयाचा मोठे परिणाम पाहायला मिळू शकतात.. कदाचित त्यावरुन वादही होण्याची शक्यता नाकारता येत नाही..

खरं तर हे प्रकरण राजस्थानमधील एका भरतीसंदर्भातील आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत नि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिलाय, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमक प्रकरण काय..?
राजस्थानमध्ये ‘बीएसएनएल’ने ‘टेक्निकल असिस्टंट’ पदासाठी परीक्षा घेतली होती. त्यात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा ‘ओबीसी’ प्रवर्गातील दोन उमेदवारांना जास्त गुण मिळाले. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना खुल्या प्रवर्गातूनच नियुक्ती देण्यात आली. मात्र, राखीव प्रवर्गातील जागा तशाच रिक्त ठेवण्यात आल्या.

राखीव प्रवर्गातील या रिक्त जागांवर ‘ओबीसी’ प्रवर्गातील, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यावी, अशी विनंती एका ‘ओबीसी’ उमेदवाराने ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ (CAT) कडे केली. कॅट’ने या उमेदवाराची विनंती मान्य करताना, ‘बीएसएनएल’ला या रिक्त जागांवर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश दिले.

Advertisement

मात्र, ‘बीएसएनएल’ने ‘कॅट’च्या या आदेशाला राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले. राजस्थान हायकोर्टानंही ‘कॅट’चा निर्णय वैध ठरवला. त्यानंतर ‘बीएसएनएल’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ‘बीएसएनएल’चे अपील फेटाळून लावले.. तसेच, या रिक्त जागांवर राखीव प्रवर्गातील पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल..
या प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं, की ‘सरकारी नोकरीत (Government Jobs) राखीव कोट्यातील उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा जास्त गुण असले, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या जागी राखीव (अधिक गुण मिळालेल्या) प्रवर्गातील उमेदवाराला प्राधान्य द्यावं…’

Advertisement

‘खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा राखीव प्रवर्गातील उमेदवारास जादा मार्क असल्यास त्या जागेवर राखीव प्रवर्गातील उमेदवाराची निवड करावी.. तसेच त्यामुळे राखीव प्रवर्गातील रिक्त राहणाऱ्या जागेवर त्याच प्रवर्गातील दुसऱ्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात यावी..’, असा महत्वपूर्ण निकाल सुप्रिम कोर्टानं दिला आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement