SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता हवा फक्त Tata चीच; ‘ही’ नव्याने येणारी इलेक्ट्रिक कार देतेय सिंगल चार्जवर 500 किमी मायलेज

मुंबई :

पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आता भारतात कही ठिकाणी पेट्रोलच्या किमती 120 रुपयांच्या पलीकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक (EV) वाहनांकडे वळत आहेत. वाहन उद्योगात गेल्या पाच वर्षांत बरेच बदल झाले आहेत. ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्यावर अधिक भर देत आहेत. भारतात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहन लाँचिंग करीत आहे. अशातच आता टाटाकडून मार्केटमध्ये धुमाकूळ करणारी कार आणली जाणार आहे.

Advertisement

टाटाने यापूर्वी नेक्सॉन-टिगॉर अशी वाहने लौंच केली. याला तगडा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता टाटाने इलेक्ट्रिक सेगमेंट अजून मजबूत करण्यासाठी आपली एक कार सादर केली आहे. Avinya concept EV असे या गाडीचे नाव असून या इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला हॅचबॅक, एमपीव्ही आणि क्रॉसओव्हरचे कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. यात एक युनिक टी लाइट सिग्नेचर, बटरफ्लाय डोअर आणि फिरणाऱ्या सीट्स (हव्या तशा अॅडजस्ट करता येणाऱ्या) देण्यात आल्या आहेत. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही कार 500 किलोमीटपर्यंतच्या रेंजसह लाँच केली जाईल.

 

Advertisement

अजून एक भारी गोष्ट म्हणजे या कारची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारात होणार आहे. Avinya concept EV कंपनीच्या जनरेशन 3 आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्यामध्ये मोठी इंटर्नल स्पेस देण्यात आली आहे.

Advertisement