SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता एलॉन मस्कला खरेदी करायची ‘ही’ कंपनी, वाचा कोणती आहे ‘ती’ कंपनी आणि काय बदल घडवून आणणार..

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यानंतर आता उद्योजक एलन मस्क यांची नजर कोका-कोला कंपनीवर असल्याचं बोललं जातंय. तसं एलॉन मस्क (Elon Musk Trending Tweet) यांनी आपण कोका-कोला कंपनी खरेदी करणार असल्याचं एक ट्वीट देखील केलं आहे. ट्विटर खरेदी करताच आता हे नवीन काय, याबद्दल लोकांना उत्सुकता लागलेली आहे.

ट्विटर कंपनीचा संपूर्ण मालकी हक्क विकत घेताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ट्वीटर खरेदी केलं असल्याचं समजतंय. आता काही दिवस न जाताच आता कोका-कोला कंपनी खरेदी करण्यासाठी एलॉन मस्क यांनी एक ट्विट करत इंटरेस्ट दाखवला आहे. मस्क यांच्या ट्विटने आंतराष्ट्रीय पातळीवर मोठा फरक पडतो. ट्विटरवर त्यांचे लाखो फॉलोवर्स असल्याने त्यांचे एक ट्विट ते उद्योजक असल्याने लोक मनावर घेतात. म्हणूनच एलॉन मस्क यांच्या कोका-कोला कंपनी खरेदीच्या ट्वीटला देखील तासाभरात 8 लाख लाईक्स आले आहेत.

Advertisement

काय होतं मस्क यांचं ते ट्विट…

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच त्यांनी आता जगप्रसिद्ध कोका-कोला (Coca Cola Compony News) या कंपनीला विकत घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासंदर्भात त्यांचं एक ट्विट सध्या भलतंच चर्चेत आहे. या ट्विटवरुन ट्विटरवर तुफान चर्चा रंगली तर कोका-कोला कंपनी ट्विटवर टॉप ट्रेण्डमध्ये आल्याची दिसतंय. खरं म्हणजे एलॉन मस्क यांनी हे ट्विट गंमत म्हणून सहज पोस्ट केलं आहे. पण मस्क यांचा काही नेम नाही, असंच सहज काही ट्विट करून त्यांनी जगभरात याआधीही खळबळ उडवली आहे.

Advertisement

उद्योजक एलन मस्क यांनी ट्वीट केलं की, “मी कोका-कोला कंपनी विकत घेणार आहे. कोका-कोलामध्ये पुन्हा एकदा कोकेनचा वापर करता यावा यासाठी कंपनी खरेदी करणार”, असल्याचे मस्क यांनी सांगितले. हे ट्विट प्रचंड आता चांगलंच व्हायरल झालंय. तीन तासांमध्ये या ट्विटला तीन लाखांहून अधिक जणांनी रिट्विट केलंय. तर अनेक ट्विटर यूजर्सकडून गंमतीशीर प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत. कोका-कोला कंपनीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत करून घ्यायचाय अर्थ त्या ट्विटचा असल्याचं सांगितलं जातंय.

पण मस्क येथेच थांबले नाही, त्यांनी अजून एका ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत एक ट्विट केलंय. त्यात त्यांनी मॅकडोनाल्ड्स हा जगप्रसिद्ध फास्टफूड ब्रॅण्ड विकत घेण्यासंदर्भात कारण देताना त्यांनी ‘मॅक्-डीमधील सगळ्या आईस्क्रीम मशीन दुरुस्त करायच्या आहेत’, असं म्हटलंय. मात्र त्यांनी हा त्यांच्या जुन्या ट्विटवर रिप्लाय दिला असता पुन्हा म्हणाले, “मी चमत्कार करु शकत नाही,” असा टोला देखील लगावला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement