SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स येणार नाहीत..? कंपन्यांना ‘ते’ प्रकरण चांगलंच भोवलं..

पेट्रोल-डिझेलची दरवाढ पाहता ग्राहक आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत सध्या प्रचंड वाढ होत असून अनेक कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणत आहेत. पण इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या अलीकडील अनेक घटना आता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर गडकरींनी ईव्ही कंपन्यांवर जोरदार टीका केली होती. आता अजून काही माहिती समोर आली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्यानंतर नितीन गडकरी यांचे रस्ते वाहतूक मंत्रालय चुकीचे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर जोरदारपणे कारवाई करण्यास तयार झाले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात EV कंपन्यांना त्यांनी उत्पादन केलेल्या काही इलेक्ट्रिक स्कूटर्सना अचानक आग लागल्याच्या घटनांबद्दल दंड ठोठावला जाईल असा इशारा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कंपन्यांना फॉल्टी स्कूटर रिकॉल करण्याचे आदेश दिले होते.

Advertisement

काही प्रकरणांमध्ये, इलेक्ट्रिक स्कूटरच्या मालकांनाही आपला जीव गमवावा लागला, ताज्या घटनेत एका माणसाचा मृत्यू आणि त्याची पत्नी आणि दोन मुलींना आगीत गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे.
Ola, Okinawa आणि Pure EV ने जवळपास 7000 स्कूटर माघारी बोलविल्या आहेत. मंत्रालयाने यांसह अनेक EV कंपन्यांना या वर्षी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि ई-बाईकचे लॉन्चिंग करण्यापासून थांबण्यास सांगितले आहे.

प्राप्त माहितीनुसार, “इलेक्ट्रिक स्कूटर्स निर्मात्यांना आगीचे कारण आणि त्या थांबवण्यासाठी आवश्यक पावले उपाययोजना निश्चित होईपर्यंत आणि तपास पूर्ण होईपर्यंत नवीन वाहनांचा बाजारात लॉन्चिंग करता येणार नाही. देशातील झालेल्या काही आगी लागण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आल्याची घोषणा देखील गडकरी यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच, इलेक्ट्रिक स्कूटर्स बनविताना निष्काळजीपणा दाखवलेल्या कंपन्यांवर दंड आकारला जाईल आणि सर्व दोषपूर्ण वाहने परत बोलावण्याचे आदेश देखील दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement