SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक : ‘या’ बड्या साऊथ अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप; इंडस्ट्रीत मोठी खळबळ

मुंबई :

मनोरंजन क्षेत्रात काम देण्याच्या बहाण्याने अनेकदा नव्या मुलींचे शोषण केले जाते. मधल्या काळात बॉलीवूडमध्येही ‘मीटू’ नावाची चळवळ समोर आली होती. ज्या माध्यमातून अनेक बड्या अभिनेत्यांवर अत्याचाराचे आरोप झाले. अशातच आता साऊथ मनोरंजन विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता आणि निर्माते विजय बाबू यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. केरळ (एर्नाकुलम दक्षिण) पोलिसांनी हा गुन्हा पिडीत महिलेच्या तक्रारीवरून दाखल करून घेतला आहे.

Advertisement

या तक्रारदार महिलेने 22 एप्रिल रोजी पोलिसांकडे येऊन विजय बाबू यांच्याविरुद्धा तक्रार केली होती. कोची येथील फ्लॅटमध्ये विजय बाबूने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारकर्त्या महिलेने केला होता. विजय बाबू याने एकापेक्षा जास्त वेळा या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्याचा आरोपही या महिलेने तक्रारीत केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रार करणाऱ्या महिलेच्या म्हणण्यानुसार, विजय बाबूने तिला चित्रपटांमध्ये भूमिका करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण झाले नाही. मात्र, गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप विजय बाबूची चौकशी किंवा त्याला अटक झालेली नाही.

 

Advertisement

विजय बाबू हे मल्याळम इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहेत. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच ते निर्माताही आहे. त्यांची ‘फ्रायडे फिल्म हाऊस’ नावाची चित्रपट निर्मिती कंपनीही आहे. मात्र आता विजय बाबूवर हा लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

Advertisement