कोरोनामुळे मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळ हा लॉकडाऊन व इतर निर्बंधामध्ये गेला आणि शाळांवर, महाविद्यालयांवर जास्त परिणाम झाले. मात्र देशासोबतच काही दिवसांपासून राज्यातही कोरोना बऱ्याचपैकी नाहीसा झाला आहे, यात एक दोन राज्य अपवाद असतील, जिथे पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढतेय.
महाविद्यालयांतील परीक्षा लांबणीवर पडल्याने ऑनलाईन शिक्षण व काही ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात होत्या.
राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने आता गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेज ऑफलाईन पद्धतीनं सुरु झाले आहेत. पण परिक्षांबद्दल मागील काही दिवसांत ठोस असा निर्णय घेतला जात नव्हता.
परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन यावर आता निर्णय जाहीर झाला आहे. आता परिक्षांविषयी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा करून त्या आता ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.
सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी राज्यामधील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची एक बैठक आयोजित केली होती. त्यात परीक्षांचा आढावा घेऊन त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत कुलगुरूंना सूचना केली होती.
तारीख झाली निश्चित, अशा होतील परीक्षा..
कालच्या (ता. 26 एप्रिल) बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, परीक्षा घेताना विद्यापीठ कडून विद्यार्थ्यांना प्रश्न संच दिले जातील. तसेच दोन पेपरमध्ये 2 दिवसांचे अंतर असणार आहे. शिवाय या परीक्षा 1 जून ते 15 जुलै दरम्यान घेतल्या जातील असे कुलगुरुंच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपल्या (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या) निर्णयावर सहमती दर्शवली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत माहीती दिली
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy