SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला माहीती आहे का? भारतात कोणत्या इलेक्ट्रीक स्कूटर्स सर्वाधिक विकल्या जातात…?

पेट्रोलचे भाव आणि सोने-चांदीचे दर म्हटले की भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. सध्या महागाईची रेस चालू आहे आणि यामध्ये सामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. यामुळे मार्केटमध्ये लाँच झालेल्या नवनवीन ईलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणाऱ्या कंपन्या सध्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. बाजारात अनेक स्कूटर्सच्या विविध मॉडेल्सना भरपूर मागणी आहे. तंत्रज्ञानामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) सध्या चलती आहे.

विक्रीच्या आकडेवारीवर एक नजर..

Advertisement

आताच्या चालू वर्षीच्या मार्च 2022 मध्ये, इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric Scooter) मार्केटमध्ये मागील 2021 या वर्षाच्या मार्चमध्ये झालेल्या विक्रीच्या तुलनेत तब्बल 795% ने वाढ झाली आहे. तसेच मार्च 2021 मध्ये 1,622 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यातच ई-स्कूटरची एकूण विक्री 14,523 युनिट्सवर गेली होती. हे नक्कीच आनंददायक आहे.

कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक विक्री..?

Advertisement

भारतात ई-स्कूटर अधिक प्रचलित करणारी आणि आकर्षक फीचर्स देखील आणणारी कंपनी म्हणजे ओला इलेक्ट्रिक ही कंपनी. ओलाने मार्च 2022 मध्ये 9127 स्कूटर्स (Scooter) विकल्या आहेत. सध्या या सेगमेंटमधील 62.85% मार्केट शेअर या कंपनीचा आहे. Ola Electric ने देखील यंदाच्या वर्षी विक्रीत मोठी वाढ केली आहे.

दुसरी कंपनी म्हणजे एथर एनर्जी (Ather Energy) जी या विक्रीच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने 2,591 ई-स्कूटर्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच मार्च 2021 मध्ये एथरने 1,177 युनिट्सची विक्री केली होती. याप्रकारे विक्रीत वर्षभरामध्ये तब्बल 120 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीचा इलेक्ट्रीक स्कूटरच्या बाजारातील हिस्सा 17.84% आहे. ही कंपनी Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर विकते, जी पूर्ण चार्ज केल्यावर 116 किमी पर्यंत चालते, असं म्हणतात.

Advertisement

सर्वसामान्यांना ऐकिवात असणाऱ्या TVS कंपनीनेदेखील या मार्केटमध्ये दमदार पदार्पण केले आहे. ही कंपनी TVS iQube या ई-स्कूटर्सची विक्री करण्यात भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्कूटरची विक्री 2021 या वर्षाच्या तुलनेत सुमारे 406 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात या स्कूटरच्या 1799 युनिट्सची विक्री झालीय. या यादीमध्ये बजाजची चेतक स्कूटर चौथ्या नंबरवर आहे. बजाज (Bajaj) चेतकने गेल्या महिन्यात 1,006 युनिट्सची विक्री केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement