SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अखेर एलॉन मस्क यांनी खरेदी केलं ट्विटर, मोजले तब्बल ‘एवढे’ अब्ज डॉलर्स..

ट्विटर खरेदीचा विषय गेल्या काही दिवसांपासून मोठा चर्चेचा विषय बनला बनला आहे. एलॉन मस्क यांनी अनेक उत्साह वाढवणारे ट्विट्स करून जगात खळबळ उडवून दिली होती. त्यांनी ट्विटर यूझर्सकडून पोलद्वारे आपलं मत देखील मागवलं होतं. त्यानुसार युजर्सने ट्विटरवर एडिट बटन असायला हवं यावर जास्त सहमत होते. मग ट्विटर खरेदीसाठी आपला इंटरेस्ट दाखवत टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी प्रस्ताव ठेवला होता आता त्यावर मोठी अपडेट समोर आली आहे.

अखेर मस्क बनले ट्विटरचे मालक..

Advertisement

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपसूर्वी आपण ट्विटरला खरेदीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचं जाहिर केलं होतं. यानंतर त्यांनी ट्विटरला प्रस्ताव पाठवला होता. काही दिवसांतच ट्विटरनं एलॉन मस्क यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार केला आणि एका न्यूज एजन्सीच्या माहीतीनुसार, आता 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) ला एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करून अनेकांना धक्का दिला आहे.

ट्विटरनं एलॉन मस्कला आपली कंपनी विकली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता Elon Musk यांच्याकडे ट्विटरचा 100 टक्के हिस्सा आहे. त्यांनी 54.20 डॉलर्स प्रति शेअर या दराने कंपनी खरेदी केली आहे. ट्विटर खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी सुरक्षित करत असल्याचे मस्क यांनी सांगितलं होतं. आता इलॉन मस्क आणि ट्विटरनं ही डील पक्की केली असून यंदाच्या वर्षीच ही फायनल होईल.

Advertisement

जॅक डॉर्सी यांनी 2006 साली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची स्थापना केली होती. फ्री स्पीचसाठी ट्विटरचं खासगीकरण होणं आवश्यक असल्याचं मस्क यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आता एलॉन मस्क यांच्या मालकीमुळे ट्विटर ही एक प्रायव्हेट कंपनी होईल.

ऍलन मस्क यांनी 25 मार्च रोजी ट्विटरवरुनच एक पोल घेत “ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मूल्य जोपासतो की नाही”, असा प्रश्न युजर्सना विचारला. या पोलवर जगातील सुमारे 20 लाखापेक्षा जास्त यूजर्सची मतं नोंदवली गेली. त्यातील 70 टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी उत्तर नकारार्थी दिलं होतं. यानंतर एलॉन मस्क यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी नवा प्लॅटफॉर्म आवश्यक वाटतो का? असा प्रश्नही विचारला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement