SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ देशातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्यावर होतोय ‘एवढा’ खर्च..? भारताचा क्रमांक कितवा, जाणून घ्या..

जगात कोणता देश शक्तिशाली आहे हे त्या देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक बाबींपेक्षा त्या देशाकडे किती सैन्य आहेत, किती लष्कर आहे, टॅंक, लढाऊ विमाने, मिसाईल्स, बॉम्ब, अशी कित्त्येक सामग्री आणि जगभरातील सर्व देशांनी सैनिकी सामर्थ्यावर केलेला खर्च यावरून अधिक ठरते. यानुसारच कमी शक्तिशाली देशांवर बलाढ्य देशांचा कब्जा होण्याचं उदाहरण आपण रशिया-युक्रेन यांच्यावरून पाहिलंच आहे.

तुम्हाला या जागतिक पातळीवरील काही गोष्टींची माहिती आज समजणार आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जगभरातील सर्व देशांनी त्यांच्या सैन्यावर 2 ट्रिलियन डॉलर्स एवढा खर्च करण्यात आल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. काही देशांकडे आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञान असतात आणि अशा गोष्टी इतर कोणत्याही देशाकडे नसतात. कोणता देश आपल्या लष्करी खर्चासाठी किती पैसे खर्च करतो याबाबत स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (Stockholm International Peace Research Institute (SIPRI) ने एक अहवाल जारी केला आहे.

Advertisement

SIPRI च्या या अहवालानुसार सन 2021 मध्ये जगातील लष्करी खर्च 2113 अब्ज डॉलर होता, जो 2020 च्या तुलनेत 0.7 टक्के जास्त आहे. SIPRI ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलंय की, या खर्चामध्ये अमेरिका, चीन, भारत, युके आणि रशिया या देशांचा मिळून सर्वाधिक वाटा म्हणजे 62 टक्के इतका आहे. कोरोनामुळे जरी काही देशांचा जीडीपी घसरला असला तरी जगातील लष्करी खर्चामध्ये सुमारे 6.1 टक्के एवढी मोठी वाढ झाली असल्याचं समजतंय.

भारत कितव्या क्रमांकांवर..?

Advertisement

SIPRI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या सैन्यावर तब्बल 2113 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत, जे 1988 नंतर केलेल्या खर्चापेक्षा खूपच जास्त आहे. सन 2020 मध्ये, जगभरातील लष्करी खर्चापैकी 3.7% वाटा भारताचा आहे, यानुसार अमेरिका आणि चीन या देशानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 वर्षात याच्यात 0.9 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अमेरिका किती खर्च करते..?

Advertisement

बलाढ्य म्हणून समजला जाणारा देश अमेरिका हा जगातील सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश आहे. या देशाने अनेक देशांवर आपला वचक दाखवला आहे. मागील 2021 साली जगातील लष्करांवर झालेल्या एकूण खर्चांपैकी एकट्या अमेरिकेच्या खर्चाचा हिस्सा हा 24 टक्के आहे. 2021 मध्ये अमेरिकेच्या लष्करी खर्चाने अंदाजे 801 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. हा खर्च 2020 या वर्षी केलेल्या खर्चाच्या तुलनेत 1.4 टक्के अधिक आहेत.

चीन देखील पुढेच..!

Advertisement

भारताशी सीमा रेषेंतर्गत कारवायांमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या चीनमुळे अनेक बैठकही झाल्या तरी तोडगा नाहीये. या चीनला त्यांच्या लष्करी खर्चाच्या बाबतीत 2021 मध्ये दुसर्‍या क्रमांक मिळाला आहे. लोकसंख्येने मोठा असलेल्या चीनचा आपल्या लष्करावर 2021 मध्ये 293 अब्ज डॉलर्स एवढा खर्च झाल्याची माहिती आहे. SIPRI च्या लष्करी खर्चाच्या डेटाबेसच्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात चीनचा लष्करी खर्च वाढत आहे. यामुळे चीन विषयी अनेक घडामोडी समोर येताना दिसत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement