SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचारी – शिक्षकांसाठी ‘गुड न्यूज’, राज्य सरकारकडून ‘या’ भत्त्यात मोठी वाढ..!

राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. सातव्या वेतन आयोगानुसार, राज्य सरकारने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाने काही दिवसांपूर्वीच मान्यता दिली.. त्यानुसार एक एप्रिलपासून ही वाढ लागू होणार आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 रोजी सातवा वेतन आयोग लागू केला. केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना त्याच तारखेपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.. त्यावेळी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यातही वाढ केली होती. मात्र, राज्य सरकारने ही वाढ केली नव्हती..

Advertisement

सातव्या वेतन आयोगानुसार, वाहतूक भत्ता (transport allowance) लागू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी करीत होते. त्यानुसार, आता ठाकरे सरकारने राज्य कर्मचारी, झेडपी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे..

700 कोटींचा बोजा
सरकारच्या निर्णयानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 675 ते 5400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबई, एमएमआर, नागपूर, पुण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1000 ते 5400 रुपये, तर इतर ठिकाणी 676 ते 2700 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर 700 कोटींचा बोजा पडणार आहे.

Advertisement

तसेच, बृहन्मुंबई, नागपूर व पुणे नागरी समूहातील अंध, अस्थि व्यंग, मणक्याच्या विकाराने पीडित, मूकबधीर, श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 2250 ते 10800 रुपये, तर इतर ठिकाणी 2250 ते 5400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. ज्यांच्याकडे शासकीय वाहन नाही, अशा सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच हा भत्ता दिला जातो.

राज्यातील सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील पूर्णकालीन शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, तसेच कृषी व कृषीत्तर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement