SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आक्रमक विराटसमोर सूर्यकुमारची बोबडी वळली, ‘त्या’ वादाबाबत सूर्यकुमारचा धक्कादायक खुलासा..!

किंग कोहली.. अर्थात विराट कोहली तर त्याच्या आक्रमतेबाबत क्रिकेट रसिकांना चांगलाच माहिती आहे.. मैदानावर त्याची आक्रमकता ठळकपणे दिसतो.. अगदी कोणत्याही संघातील, कोणत्याही खेळाडूला खुन्नस द्यायला, तो मागेपुढे पाहत नाही..

आयपीएल-2020 मध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ विरुद्ध ‘मुंबई इंडियन्स’ यांच्यात महत्त्वाचा सामना सुरु होता. मुंबईचे फलंदाज एका बाजूने बाद होत असताना, सूर्यकुमारने पिचवर नांगर टाकला होता. काही केल्या तो आऊट होत नसल्याने विराट काहीसा चिडला होता.. त्याच वेळी सूर्यकुमारने मारलेला एक चेंडू विराटकडे गेला.. नि तेथेच या दोघांमधील संघर्ष पाहायला मिळाला..

Advertisement

दरम्यान, गेल्या काही दिवसांत हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या दोघांनी एकमेकांना जबरदस्त ठसन दिली होती.. त्यावेळी सूर्यकुमारच्या मनात नेमकं काय चाललं हे आता समोर आलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमारने त्या प्रसंगाचा संपूर्ण किस्सा सांगितला..

Advertisement

सूर्यकुमार काय म्हणाला..?
“विराट कोहलीची एक स्वतःची स्टाईल आहे.. त्याची ‘एनर्जी लेव्हल’ वेगळ्याच स्तरावर असते. मुंबई व बंगळुरू दोन्ही संघांसाठी तो सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे तो सतत स्लेजिंग करत होता. पण, मी लक्ष विचलित होऊ दिलं नाही.. काहीही करून जिंकायचं, हे मनाशी पक्कं केलं होतं.. त्याच्याकडे चेंडू गेला, तेव्हा तो माझ्याजवळ आला..”

“तो बराच वेळ माझ्याकडे रोखून पाहत होता. मी च्युईंगम खात होतो, परंतु आतून मी खूप घाबरलो होतो. हृदयाचे ठोकेही एकदम जलद पळत होते. मी त्याला काहीच प्रत्युत्तर दिले नाही. मी आतून खूप घाबरलो होतो, पण चेहऱ्यावर मात्र तसे भाव मी दाखवले नव्हते..”

Advertisement

“नेमकं काय करावं, हे मला समजत नव्हतं. विराट माझ्याकडे चालत आला, तेव्हा मी मनात त्याला म्हटलं, की ‘भाई, तुझ्या पाया पडतो, पण यावेळी काही बोलू नकोस. आम्ही दोघं एकमेकांसमोरच होतो. त्याच वेळी माझ्या हातून बॅट पडली नि तो क्षण बदलला, पण त्यावेळी माझ्या अंगावर काटा आला होता..”

Advertisement

दरम्यान, हा किस्सा घडला, तेव्हा विराट हा भारताचा कर्णधार होता, तर सूर्यकुमारने देशासाठी एकही सामना खेळला नव्हता. त्यामुळे कदाचित सूर्याला खून्नस देत दडपणाखाली आणण्याचा विराटचा प्रयत्न होता. पण सूर्यकुमारने 79 धावांची खेळी करताना मुंबईला एकहाती सामना जिंकून दिला होता..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement