SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चेन्नईचा शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय, विजयाचा हिरो ठरला धोनी..

एमएस धोनीच्या (MS Dhoni) धमाकेदार बॅटिंगच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या यंदाच्या आयपीएल 2022 काल झालेल्या महत्वाच्या सामन्यात पराभव केला आहे. प्ले- ऑफ्समध्ये एंट्री मारण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येक सामन्यात विजय आवश्यक आहे.

अखेरच्या चेंडूवर विजय..

Advertisement

मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला (Mumbai indians vs Chennai Super Kings) शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांची गरज असताना, महेंद्रसिंग धोनीने जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर चौकार खेचून रोमांचक विजय मिळवून यंदाच्या हंगामात आणखी एका विजयाची भर घातली.

अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 17 धावा गरजेच्या होत्या. त्यात उनाडकटने पहिल्या बॉलला प्रिटोरियसची विकेट घेतली. मग बॅटिंगला आलेल्या ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर धोनीने सिक्स खेचला, मग चौथ्या बॉलला चौकार मारून सीएसकेला विजयाजवळ पोहोचवलं. पाचव्या चेंडूवर 2 धावा काढल्यानंतर शेवटच्या चेंडूवर सीएसकेला 4 धावा हव्या असताना धोनीने चौकार मारून मुंबईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला.

Advertisement

चेन्नई सुपर किंग्स: मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच चेंडूवर डॅनियल सॅम्सने धक्का बदिला. त्याने ऋतुराज गायकवाडला शून्यावर बाद केलं. मुंबईने चेन्नईला वारंवार धक्के देत दबावात ठेवलं. चेन्नईच्या अंबाती रायुडूने सर्वाधिक 40 धावा केल्या, रॉबिन उथप्पाने 30 धावा करत संघाला चांगली साथ दिली. याशिवाय धोनी 13 बॉलमध्ये 28 धावांवर नाबाद राहिला. सॅम्सला 4 विकेट्स, जयदेव उनाडकटला 2 आणि रिले मेरेडिथला 1 विकेट मिळाल्या.

मुंबई इंडियन्स: मुकेश चौधरीने पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांना शून्यावर बाद केलं. एकाकी झुंज देत तिलक वर्माने नाबाद 51 धावा, सूर्यकुमार यादवने त्याला साथ देत 32 धावा आणि ऋतीक शौकीनने 25 धावा केल्या. यामुळे मुंबईला 155 रनपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून मुकेश चौधरीने 3 विकेट्स, ब्राव्होने 2, सॅन्टनर, तीक्षणा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement