SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज जागतिक वसुंधरा दिन : ‘या’ दिवसाचा इतिहास नि महत्व जाणून घ्या..!

आज जागतिक वसुंधरा दिन… जगातील प्राणी, वनस्पती आणि जीव-जंतू वाचवण्यासाठी, तसेच जगभरातील लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 22 एप्रिल 1970 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 22 एप्रिलला ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो..

माणसाचा हव्यास वाढतच आहे. विकास नि प्रगतीच्या नावाखाली माणूस निसर्गावर विजय मिळवू पाहात आहे. त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे.. औद्योगिकरणाच्या नादात पर्यावरणाची अपरिमित हानी होत असताना, त्याकडे माणसाचे लक्षच नसल्याचे दिसते.. अशा वेळी तर या दिवसाचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं..

Advertisement

जागतिक वसुंधरा दिनाचा इतिहास
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरामध्ये 22 जानेवारी 1969 रोजी तीन दशलक्ष गॅलन तेलाची समुद्रात गळती झाली. त्यामुळे 10 हजार सी-बर्ड्स, डॉल्फिन, सील आणि सी-लायन्सचा मृत्यू झाला. पर्यावरणाची मोठी हानी झाली.

दरम्यान, या घटनेबाबत विचार करीत असतानाच, अमेरिकन सिनेटर गेलोर्ड नेल्सन (Gaylord Nelson) यांनी पर्यावरण संरक्षणासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच 22 एप्रिल 1970 रोजी त्यांनी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

साधारण दोन कोटी अमेरिकन लोकांनी सहभागी होत ‘जागतिक वसुंधरा दिन’ पहिल्यांदा साजरा केला होता.. पर्यावरणविषयक शिक्षण म्हणून हा दिवस पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला. आज 195 पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो..

या दिवशी काय कराल..?
वसुंधरा दिनानिमित्त आपण समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती करु शकतो. त्यासाठी पर्यावरण प्रेमींचे गट स्थापन करता येतील. त्या माध्यमातून पर्यावरण विषयक चित्रपट, प्रदर्शन, चर्चासत्रांचे आयोजन करता येईल. वृक्षारोपण, प्रदुषण टाळण्यासाठी जनजागृती, रासायनिक गोष्टीपेक्षा सेंद्रीय गोष्टी वापरण्यावर भर, अशा अनेक गोष्टी अंमलात आणून आपण पर्यावरणाबद्दल जनजागृती करु शकतो.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement