शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांना न्यायालयावर टीका करणं अडचणीत आणू शकतं, अशी शक्यता आहे. कारण इंडियन बार असोसिएशनने राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक अवमान याचिका दाखल केली आहे. संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही याचिका उच्च न्यायालयात इंडियन बार असोसिएशनने दाखल केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत इतर काही भाजप नेत्यांना न्यायालयाकडून झुकतं माप दिलं जातं. तसेच फक्त भाजपाच्याच नेत्यांनाच दिलासा मिळतो आणि त्यांना जामीन देखील मंजूर होतो. यामुळे जनतेचा न्यायालयाच्या निर्णयाकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
त्यासोबतच न्यायालयाची तीच भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांच्या बाबतीत दिसून येत नाही, असा संजय राऊत यांचा रोख नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाबतीत होता. याप्रकरणी आता न्यायालयाने सुमोटो अवमान याचिका दाखल करुन ‘राऊत यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी केलेला हा आरोप चुकीचा असल्याचा दावा आता या याचिकेतून केला जात आहे. अशाप्रकारणे खुलेपणाने न्यायव्यवस्थेवर टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. खासदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारीचं पद असताना त्यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेवर बोलताना सांभाळून बोलायला हवं होतं, अशा पद्धतीची ही याचिका असून आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy