राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात सध्या महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल डिझेल असो, दैनंदिन लागणाऱ्या वस्तू व किराणा मालाचे भाव असो की भाजीपाला असो अशा सर्वांची चांगलीच दरवाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता आणखी एक धक्का राज्यातील लोकांना लागणार असून, सलून व ब्युटीपार्लर असणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी असणार आहे
राज्यात असणाऱ्या सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी दरवाढ करत असल्याचा आज निर्णय घेत व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. सलून व ब्यूटी पार्लर (Salon & Beauty Parlour) व्यावसायिकांनी दरवाढ केली आहे. त्यामुळे आता दाढी करणे आणि केस कापणे महागणार आहे. तर ब्यूटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांनादेखील दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.
राज्यातील सलून तसेच ब्युटी पार्लर व्यावसायिक यांनी ऑनलाईन बैठकीत दरवाढीचा निर्णय घेत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 30% दरवाढीचा निर्णय घेतला आहे. 1 मे (कामगार दिन) पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान नागरीकांनीसुद्धा या होणाऱ्या दरवाढीला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन सलून & ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांच्याकडून करण्यात आले आहे.
राज्यातून अनेक दिवसांपासून दरवाढ करण्यासाठी व्यावसायिकांची मागणी होत होती असोसिएशनचे जवळपास 52,000 सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत. अशी माहिती सलून अँड ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे
दरवाढीचे कारणे काय?
1) ब्युटी प्रॉडक्ट/पेट्रोल/गॅस सिलेंडर/खाद्यतेल/शाळांची फी यांसह इतर दरवाढ
2) कोरोना काळातील स्थिती व लॉकडाऊननंतर अंदाजे 50% कमी झालेले ग्राहक आणि वाढती बेरोजगारी
3) सरकारचे नाभिक समाज व सलून व ब्यूटी पार्लर व्यवसायिक यांच्या मागण्यांकडे सुरू असलेले दुर्लक्ष
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy