मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी मोदी सरकारने एक खास योजना सुरु केली होती. सुकन्या समृद्धी योजना.. असं या योजनेचं नाव.. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ धोरणाअंतर्गत 21 जानेवारी 2015 रोजी ही योजना सुरु करण्यात आली.. त्यातून चांगला परतावा मिळत असल्याने या योजनेला सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद मिळाला..
सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojna) गुंतवणूक केल्यानंतर मुलींचे उच्च शिक्षण, लग्नासाठी एकदम मोठा निधी मिळतो. तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर ती थेट करोडपतीही होऊ शकते. या योजनेत अधिकाधिक लोक जोडले जावेत, यासाठी मोदी सरकारने त्यात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
सुकन्या समृद्धी योजनेतील बदलाबाबत..
– सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पालकांना आधी फक्त 2 मुलींच्या खात्यावरच आयकरातून सूट मिळत होती.. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून, तिसऱ्या मुलीसाठीही ही सूट लागू करण्यात आली आहे. पहिली मुलगी झाल्यानंतर दुसऱ्यांदा जुळ्या मुली झालेल्या पालकांसाठी हा मोठा दिलासा आहे.
– याआधी खातेधारक मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतरच तिचे खाते चालवू शकत होती, पण आता वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरच ती हे खातं चालवू शकणार आहे. मुलीचे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत फक्त आई-वडील किंवा पालक तिचे खाते ‘ऑपरेट’ करू शकतील.
– मुलींच्या खात्यात दरवर्षी किमान 250 रुपये जमा न झाल्यास हे खाते ‘डिफॉल्ट’ मानलं जात होतं.. पण आता तसं होणार नाही. मुदतपूर्तीपर्यंत जमा केलेल्या रकमेवर व्याज दिले जाईल.
– मुलीचे मुदतपूर्तीपूर्वी निधन झाल्यास, तिचा पत्ता बदलल्यास योजनेचे खाते बंद केले जाऊ शकतं. तसंच, मुलीला जीवघेणा आजार झाला, तरी हे खाते बंद करता येणार आहे. पालकांचे निधन झाले तरी खाते आधी बंद केले जाऊ शकते.
– सध्या सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते. त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंत आयकरातून सवलत मिळते.