SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): मनाची विशालता दाखवाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल.धनार्जन होण्याची शक्यता. दिवसभर चिंता जाणवेल. विनाकारण धावपळ होईल. धनलाभाच्या दृष्टीनं अत्यंत अनुकूल काळ आहे. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा.

वृषभ (Taurus): उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मोठ्या उलाढाली होतील. त्यात आपल्याला फायदा होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. विविध प्रकारचे लाभ होतील. घरात थोडे गैरसमज होतील. नोकरीत बदलीची शक्यता आहे.

मिथुन (Gemini) : भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण करता येईल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. निसर्गाच्या सहवासात रमून जाल. व्यवहार करताना धोका पत्करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्‍या मिळतील, त्यांची सरबराई करण्यात वेळ द्यावा लागेल. नोकरीत उच्चाधिकार मिळतील. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. मनातील भावना समजून घ्या.

कर्क (Cancer) : मानसिक समाधान लाभेल. मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.रोजगार मिळण्याची संधी मिळेल. व्यवहार करताना काळजी घ्या.मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. काहींना प्रवास करावा लागेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. अचानक मोछा प्रस्ताव समोर येईल. घरी पाहुणे येतील.

Advertisementसिंह (Leo) : जवळच्या सहलीचा आनंद घ्याल. मित्रमंडळी जमवाल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल. सासुरवाडीची मदत मिळेल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. उत्पन्न स्थिर राहील. संमिश्र ग्रहमान आहे. काही कामे सहजासहजी होतील. काही कामे रखडतील. सूर्यास्ताच्या आत महत्त्वाचे काम करून घ्या. मुलांना यश मिळेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होती.

कन्या (Virgo) : मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल. हातून चांगले लिखाण होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल. गाडी चालवताना काळजी घ्या. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. तब्येतीकडे लक्ष द्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात सायंकाळनंतर यश मिळेल. ग्रहमानाच्या अनुकूलतेचा फायदा होईल. भागीदारी व्यवसाय जपून करा.

तुळ (Libra) : लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल.महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा. निश्चितच यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. काहींना भेटवस्तू मिळतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. प्रवासात दगदग होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : प्रेमभावना वाढीस लागेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल. आपले महत्व इतरांना पट‍वून द्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. जोडीदाराबद्दल चिंता वाटेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालना. जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. काळजी घ्या. वाहने जपून चालवा. तुमच्या शब्दाला मान राहील.

Advertisement


धनु (Sagittarius) : कामाचा व्याप वाढू शकतो. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. गुरूजनांचा सहवास लाभेल.घरात चिंतेचे वातावरण राहील. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. धर्मकार्यात मन लागेल. संमिश्र ग्रहमान आहे. महत्त्वाच्या कामात दुपारनंतर यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो आराम करा. हाती पैसा आल्याने चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील.

मकर (Capricorn) : औद्योगिक वातावरण चांगले राहील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. सहृदयतेने वागणे ठेवाल. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील.मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. कोर्टाची कामे निकाली लागतील. हातातून मोठे काम होईल. नोकरीत बदल होतील. कामाचा ताण वाढेल. काहींना प्रवास करावा लागेल. घरी पाहुण्या-रावळ्यांचे आगमन होईल. प्रवासात काळजी घ्या.

कुंभ (Aquarious) : मानसिक चंचलता जाणवेल. अचानक धनलाभ संभवतो. सर्वांशी आपलेपणाने वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे कल राहील.धोका पत्करू नका. मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. गृहसौख्य चांगले राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या घटना घडतील. नावलौकिक वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील.

मीन (Pisces) : मनातील आकांक्षा पूर्ण होतील. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. चारचौघात तुमचे कौतुक होईल. आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. उत्पन्न स्थिर राहील.आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मानसन्मान प्राप्त होती. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. चांगल्या संधी चालून येतील.

Advertisement