चांगल्या भविष्यसाठी अनेक जण दीर्घकालीन किंवा कमी कालावधीसाठी गुंतवणूक (Investment) करतात. इतर योजनांमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कित्येक पटीने नफा होतो. मात्र नुकसान होण्याची शक्यताही तितकीच असते. मात्र पोस्ट ऑफीसातील गुंतवणूक ही नेहमीच सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेक जण विश्वास ठेवून पोस्टात गुंतवणूक करतात. पोस्टामार्फतही गुंतवणूकदारांसाठी एकसेएक भन्नाट योजना आणल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूकदाराला चांगला नफा मिळतो. पोस्टाची अशीच एक अशीच जबरदस्त योजना आहे.
पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्किम एक अशीच चांगली (Post Office MIS) स्मॉल सेव्हिंग, सुरक्षित गुंतवणूक आहे. या योजनेत एकदाच पैसे जमा करावे लागतात. MIS अकाउंटचा मॅच्युरिटी पीरिएड 5 वर्षांचा असतो. म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला गॅरेंटीड मंथली इन्कम मिळू लागेल.
एकल गुंतवणूकदारांना दरमहा किमान 2475 रुपये किंवा 29,700 रुपये उत्पन्नाची हमी मिळते, तर जॉईंट अकाउंटमध्ये हा नफा दुप्पट होतो. जर तुम्ही या योजनेत सिंगल खाते उघडले, तर 4.5 लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील. तर जॉईंट अकाउंटद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याजाने संपूर्ण वर्षभरात मिळणारी रक्कम 12 महिन्यांत विभागली जाते. प्रत्येक महिन्याला मिळणारी रक्कम हे तुमचे मासिक उत्पन्न असते.
या अकाउंटचा कालावधी पाच वर्षांचा असतो. यात प्रीमॅच्योर क्लोजरही मिळतं. डिपॉजिटच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता. या योजनेनुसार, एक वर्ष ते तीन वर्षामध्ये पैसे काढल्यास डिपॉजिट अमाउंट 2 टक्के कापून दिली जाते. जर अकाउंट ओपन केल्यानंतर तीन वर्षांनंतर पण पाच वर्ष मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढल्यास जमा रकमेवरील 1 टक्का कापून पैसे परत दिले जातात.
किती मिळते व्याज :-
- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) 6.6 टक्के वार्षिक व्याज देते.
- खाते उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि मुदतपूर्ती होईपर्यंत व्याज देय असेल.
- दरमहा देय असलेल्या व्याजावर खातेदाराने दावा केला नसेल, तर अशा व्याजातून कोणतेही अतिरिक्त व्याज जमा होणार नाही.