जगात एकेक विशेष फिचर आणत व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेजिंग अॅपने आपलं वर्चस्व आणखी वाढवत स्पर्धकांना जणू चॅलेंजच केलं आहे. व्हॉट्सअॅप 2022 या अलीकडेच अनेक फिचर्स आणली आहेत आणि आणखी काही येत आहेत. जी लवकरच सर्व व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी सादर केली जाईल. या फीचर्समध्ये कम्युनिटीज, मेसेजला तात्काळ रिप्लाय देण्यासाठी इमोजी रिअॅक्शन्स, व्हॉट्सअॅप युजर्ससाठी 2GB डेटा फाईल शेअरिंग, एका टॅबमध्ये 32 लोकांना कॉल करण्याची सुविधा असे काही धमाकेदार फीचर्स व्हॉट्सअॅप आणत आहे.
व्हॉट्सअॅप आणखी एक कोणतं फिचर आणतंय..?
WABetaInfo च्या अहवालानुसार, मेटा कंपनीच्या मालकीचे व्हॉट्सअॅप लोकांच्या प्रायव्हसीच्या दृष्टीने खास अशा वैशिष्ट्यावर काम करत आहे, जेथे युजर्स त्यांचे “लास्ट सीन” स्टेटस लपवू शकतील. iOS युजर्ससाठी नवीन व्हॉट्सअॅप बीटा वर्जनमध्ये याची चाचणी केली जात असल्याची माहिती आहे.
व्हॉट्सअॅपच्या या महत्वाच्या फीचरच्या रोलआउटनंतर, कोणीही व्हॉट्सअॅप युजर स्वतःचे लास्ट सीन फक्त त्याच लोकांना दाखवू शकतो, ज्यांना त्या युजरला दाखवायचे आहे. यूजर आता ज्या लोकांसोबत बोलू इच्छित नाही किंवा लास्ट सीन दाखवू इच्छित नाही अशा लोकांसाठी स्वतःचा लास्ट सीन तो हाईड अर्थात लपवू शकतो. म्हणजेच, आता तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप गुपचूप वापरण्यास सक्षम असाल आणि तुम्ही व्हॉट्सअॅपवर अॅक्टिव्ह असताना इतर लोकांना त्याबद्दल माहितीही नसणार आहे.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. या फीचरसाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल, जिथे तुम्हाला प्रायव्हसी सेक्शनमध्ये जावं लागेल. मग “लास्ट सीन” पर्यायावर जा आणि “Everyone,” “My Contact List” आणि “Nobody” मधील पर्याय निवडा. यानंतर हे फीचर तुमच्या व्हॉट्सअॅपवरही काम करण्यास सुरुवात करेल, अशी माहिती अहवालात दिली आहे. पण त्यासाठी हे फिचर येईपर्यंत थांबावं लागणार आहे.
अहवालानुसार, व्हॉट्सअॅपने प्रोफाईल पिक्चर्स आणि “अबाउट” सेक्शनसाठीदेखील मिळतेजुळते फिचर करण्याच्या तयारीत आहे. या फीचरमुळे यूजर्स हे ठरवू शकतील की त्यांचे व्हॉट्सअॅप प्रोफाइल पिक्चर कोण पाहू शकतात. तुम्ही व्हॉट्सअॅप सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > लास्ट सीन / प्रोफाईल फोटो / अबाउट हे फीचर उघडल्यास तुम्हाला ‘Accept My Contact’ नावाचा नवीन पर्याय मिळू शकेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy