SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. वयाने लहान असणार्‍या लोकांशी मैत्री कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. काहींना धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागेल.

वृषभ (Taurus): आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल.
स्थिर विचार करावेत. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. अविचाराने त्रास वाढू शकतो. नावलौकिक वाढवण्याच्या घटना घडतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील.

मिथुन (Gemini) : हुकुमशाहीपणा दूर सारावा. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहा. घरात माणसांची ये-जा असेल. काही चुकले की लगेच त्याचा बदला घेणे योग्य नाही. गैरसमजातून वाद वाढू देवू नका. गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धि चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तूंची देवाण घेवाण होईल. व्यवसायात भरभराट होईल.

कर्क (Cancer) : तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे चांगले असेल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.उत्तम व्यावसायिक लाभ होईल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. खर्चाला आवर घाला.

सिंह (Leo) : कामाच्या ठिकाणी तुमचे प्रस्तावाचा अनेक लोकं स्वीकार करतील. पैशांच्या बाबतीत लक्षवेधी ऑफर मिळू शकतात. नवीन विचार अंमलात आणावेत. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. काही अचानक किरकोळ अडचणी समोर उभ्या राहतील.

कन्या (Virgo) : गृहीणींना वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा येईल. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाछी तुमच्या मर्जीनुसार वागेल. नाराजी राहील.

तुळ (Libra) : कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे आनंद होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : न्यायी दृष्टीकोन बाळगाल. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल. बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. बौद्धिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आवडीचे पदार्थ ताटात दिसतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

धनु (Sagittarius) : तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या उत्पन्नात झालेली वाढ ठळकपणे दिसून येईल. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. काहींना नवीन संधी मिळेल. विक्री चांगली होईल. फायद्याचे सौदे ठरतील. नवीन कल्पना अस्तित्वात येतील.

मकर (Capricorn) : आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहा. योग्य कल्पकता दाखवाल. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

कुंभ (Aquarious) : घरात माणसांची ये-जा असेल. आज व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य सामान्यतः चांगले असेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. प्रवासात दगदग होईल.

मीन (Pisces) : जुने नुकसानही भरून काढता येईल. सामाजिक जीवनात सहभाग वाढेल. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. योग्य अनुमान काढावे.पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. थोडा संयम ठेवलेला बरा. व्यवहारात यश मिळेल. सुहृदांचे सहकार्य मिळेल. अनेकांचे कळत नकळत सहकार्य मिळेल. कार्यक्रमात जाऊ वाटेल.

Advertisement