प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे छोटा का होईना, पण स्वत:चा व्यवसाय असावा.. नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला.. प्रत्येकाकडे व्यवसायाबाबत काही ना काही कल्पना असतात, पण त्या सत्यात उतरवण्यासाठी अडचण येते, ती भांडवलाची.. त्यामुळे बऱ्याचदा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचं स्वप्न अधुरं राहतं..
कमी गुंतवणुकीत, कमी साधनांमध्येही तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकता.. ठिकठिकाणी असे अनेक व्यवसाय आपल्याला पाहायला मिळतात नि त्यातून रग्गड कमाईही होत असल्याचे दिसते.. चला तर मग अशाच एका व्यवसायाबाबत जाणून घेऊ या..
नवीन व्यवसायाबाबत…
खाद्य तेलाला (Edible Oil) नेहमीच मागणी असते. त्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही.. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची विक्री होते नि त्याला चांगला भावही मिळतो.. तुम्ही अगदी कमी पैशात एखादी लहान ‘ऑईल मिल’ सुरु करु शकता. शिवाय, गाव असो वा शहर कुठेही हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो.
पूर्वी मोहरीचं तेल(Mustard Oil) काढण्यासाठी मोठ्या मशीनचा वापर होत असे, पण आता पोर्टेबल मशिन्स आली आहेत. या मशीनची किंमतही कमी असून, या मशीन बसवायला जागाही जास्त लागत नाही. अगदी कमी श्रमात या पोर्टेबल मशीन चालवता येतात..
असा सुरु करा व्यवसाय..
- खाद्य तेलाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तेल काढण्याचं यंत्र, ते लावण्यासाठी एक मोठी खोली आणि ज्या बियांपासून तेल काढायचं आहे, तो कच्चा माल लागेल.
- मोहरी, भुईमूग, तीळ अशा तेलबियांपासून तेल काढण्यास सक्षम असणारे यंत्रं बाजारात उपलब्ध आहेत. घरगुती स्वरुपात हा व्यवसाय करण्यासाठी मध्यम आकाराचं ‘ऑईल एक्सपेलर मशीन’ योग्य ठरेल.
खर्च किती येईल..?
‘ऑईल एक्सपेलर’ मशीन खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये खर्च येईल. ‘ऑईल मील’ सुरू करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. मिलच्या संपूर्ण उभारणीसाठी साधारण 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. तुम्ही चांगल्या दर्जाचं प्रॉडक्ट दिल्यास व्यवसायाला नक्कीच गती मिळेल.
कमाई किती होईल..?
‘ऑईल मिल’साठी केलेला खर्च एका वर्षात वसूल होऊ शकताे. नंतर दरवर्षी तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळू शकतं. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन मार्केटिंगची मदत घेऊ शकता. शिवाय, किरकोळ विक्रीसाठी बाजारात तुमचं काउंटर सेट करू शकता. शिवाय, तेलाबरोबरच पेंडीलाही मोठी मागणी असते..
पशुपालन करणारे लोक पेंड खरेदी करतात. त्यातूनही तुमची चांगली कमाई होऊ शकते. पोर्टेबल मशीनच्या सहाय्यानं तेलबियांपासून तेल काढण्याची प्रक्रिया सोपी आहे. त्यामुळे महिलादेखील हा व्यवसाय सहज करू शकतात. नोकरीपेक्षा या व्यवसायातून चांगली कमाई होऊ शकते..