SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँक आणि पोस्ट ऑफिसपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या ‘या’ सरकारी ठिकाणी गुंतवा पैसे; कमी काळात व्हा मालामाल

मुंबई :

देशातील सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीपैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF). या योजनेत तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या सरकारी योजनेत हमखास परतावाही उपलब्ध आहे. सध्या लोकांना असा पर्याय हवा आहे, ज्यात गुंतवलेल्या पैशावर सुरक्षितता आणि जास्त प्रमाणात परतावा अपेक्षित असतो. असाच एक पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Advertisement

सुरक्षितता आणि जास्त प्रमाणात परतावा म्हटल्यावर आपल्याकडे काही ठराविक बँका आणि पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्सची नावे समोर येतात. पण आज आम्ही ज्या पर्यायाबद्दल सांगणार आहोत, तो सुरक्षित तर आहेच पण बँका आणि पोस्ट ऑफिसपेक्षा जास्त परतावा देणारा आहे. Public Provident Fund या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा मिळवू शकता.

 

Advertisement

PPF खात्यांचे व्याजदर भारत सरकारकडून दर तिमाहीत जारी केले जातात आणि ते वाढवले ​​जातात किंवा कमी केले जातात. सध्या, PPF खात्यावरील व्याज दर 7.1 टक्के आहे, जो बँका किंवा पोस्ट ऑफिसच्या इतर गुंतवणूक साधनांपेक्षा चांगला मानला जातो. PPF खात्यात गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ मिळतो. त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या दोन्हींवर कर सूट उपलब्ध आहे. PPF मध्ये, तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय तुम्ही एका वर्षात तुमच्या PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता.

Advertisement