SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेती उपकरणांसाठी मिळणार मोठे अनुदान, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या..!

भारत हा कृषीप्रधान देश.. देशातील मोठ्या संख्येने लोक शेती करतात. भारताच्या विकास दरात (जीडीपी) कृषी क्षेत्राचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्याच्या घरात सुखा-समाधानाचे दिवस यावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असतात.

कृषी योजनांद्वारे शेतकऱ्यांना कमी किमतीत बियाणे, खते, कृषी उपकरणे पुरवली जातात. त्यासाठी कृषी उपकरणांवर सुमारे 50 ते 80 टक्के सवलत दिली जाते.. शेती उपकरणे घेण्यासाठी केंद्र सरकार अशीच एक योजना चालवते.. ‘स्माम किसान योजना’ असं या योजनेचं नाव.. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

स्माम किसान योजनेबाबत..

देशातील कोणताही शेतकरी ‘स्माम’ योजनेचा (‎SMAM Kisan Yojana) लाभ घेऊ शकतो. महिला शेतकरीही या योजनेचा फायदा घेऊ शकतात.. त्यासाठी फक्त शेतीचा ‘सात-बारा’ उतारा तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर या योजनेद्वारे केंद्र सरकार 50 ते 80 टक्के अनुदान दिलं जातं..

Advertisement

शेती उपकरणांच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, महागडी उपकरणे घेऊन शेती करणं शेतकऱ्यांना शक्य नाही. केंद्राचे अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होऊन उपकरणे घेता येतात.. आधुनिक यंत्रामुळे शेतकऱ्यांचे काम सुखकर होते, शिवाय उत्पादनात वाढ होते..

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Advertisement
 • आधार कार्ड
 • वास्तव्याचे प्रमाणपत्र
 • सात- बारा, 8 अ उतारा
 • बँक पासबुक
 • मोबाइल क्रमांक
 • जातीचा दाखला
 • पासपोर्ट फोटो

योजनेसाठी असा करा अर्ज..

 • सर्वप्रथम https://agrimachinery.nic.in/  या संकेतस्थळावर जा.
 • संकेतस्थळावर ‘Registration’ पर्यायावर क्लिक करा.
 • नंतर ‘फार्मर’ या पर्यायावर क्लिक केल्यास एक पेज सुरू होईल.
 • त्यावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
 • त्यानंतर नाव, आधार क्रमांक नमूद करा
 • त्यानंतर तुम्हाला अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागणार.
 • शेवटी, सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement