SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गुगल’ने कायमचं बंद केलं ‘हे’ महत्वाचं फीचर, नागरिकांची होणार मोठी गैरसाय..!

‘गुगल’.. कोणत्याची प्रश्नाचं उत्तर देणारं लोकप्रिय ॲप.. जगात सर्वाधिक लोक या ‘ॲप’चा वापर करतात.. स्मार्टफोन हातात आल्यापासूनच तर या ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय.. ‘गुगल’वरील विविध फीचर्स नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे पाहायला मिळते..

‘गुगल’नं 2018 मध्ये एक महत्वाचं फीचर लाॅंच केलं होतं.. ‘गुगल स्नॅपशाॅट’ (Google Snapshot) असं या फीचरचं नाव.. मात्र, अतिशय कमी लोकांना या फीचरबाबत माहिती होती. त्यामुळे त्याचा वापरही मर्यादित स्वरुपात होत होता.. मात्र, ‘गुगल’ने आता कायमस्वरुपी हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे यापुढे युजर्सला हे फीचर वापरता येणार नाही..

Advertisement

अनेक अँड्रॉइड युजर्सला या छोट्या, पण अतिशय कामाच्या फीचरबाबत माहिती नव्हती. अतिशय कमी प्रमाणात त्याचा वापर होत असल्याने या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘गुगल’ने आपल्या ‘ॲप’वर दिलेल्या नोटिशीत ‘स्नॅपशाॅट’ फीचर लवकरच बंद करण्याची घोषणा केली होती, पण त्यासाठी ‘गुगल’ने कोणतीही निश्चित तारीख दिली नव्हती.

दरम्यान, आता या महिनाअखेरीस (एप्रिल 2022) अँड्रॉइड स्मार्टफोन्समधून हे फीचर हटवलं जाणार आहे. हे फीचर ‘गुगल’च्या डिस्कव्हर पेजवर दिलं जात होतं. मात्र, आता ते दिसणार नसल्याचे सांगण्यात येतं..

Advertisement

खरं तर आपल्या युजर्सला सतत अपडेटेड ठेवण्यासाठी ‘गुगल’ने नेहमीच वेगवेगळी फीचर्स सादर केले आहेत. परंतु, बऱ्याचदा ग्राहकांना त्याची माहिती नसते.. त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात त्याचा वापर केला जातो… त्यामुळे ‘गुगल’ला अशी फीचर्स बंद करण्यासारखा निर्णय घ्यावा लागतो.. ‘गुगल’ने यापूर्वीही अशी अनेक फीचर्स बंद केले आहेत..

‘स्नॅपशाॅट’चे महत्व..
‘गुगल’नं आता हे फीचर रिमूव्ह केलं आहे. खरं तर अँड्रॉइड स्मार्टफोनवर चालणारं हे फीचर अतिशय कामाचं होतं, पण खूप कमी लोकांना याबाबत माहिती होती. गुगल असिस्टंट (Google Assistant) स्क्रिनवर हे फीचर ‘इनबॉक्स’प्रमाणं दिसायचं.. त्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सला त्यांची सध्याची माहिती सहज मिळत असे. अपॉइंटमेंट, वेदर फोरकास्ट, ट्रॅफिक नि रिमाइंडर सारखे डिटेल्स एका क्लिकवर स्क्रॉलेबल इंटरफेससह मिळत होते.

Advertisement

2012 मध्ये गुगल नाऊ (Google Now) हे फीचर सुरु केलं होतं. ‘डिजीटल पर्सनल असिस्टेंट’सारखं ते काम करीत होतं. नंतर या फीचरची जागा ‘गुगल असिस्टंट’ने घेतली. आता ‘गुगल’ने ‘स्नॅपशाॅट’ही बंद केलं. ‘गुगल’ने एक सपोर्ट पेज तयार केलं असून, त्यावर युजर्स त्यांचा डेटा कुठे मिळवू शकतील, याची माहिती दिली जाणार आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement