SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, ‘या’ कारणांमुळे किमतीवर झालाय परिणाम…!

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे लग्न समारंभावर निर्बंध घातले होते. मात्र, आता पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्न सोहळे सुरु झाले आहेत.. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालीय.. त्याचा परिणाम भावावर दिसून येत आहे. शिवाय जागतिक घडामाेडींचाही सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे..

मुंबईत एक ग्रॅम सोन्याची किंमच 22 कॅरेटसाठी 4955 रुपये, तर 24 कॅरेट सोन्यासाठी 5406 रुपये मोजावे लागत आहे. शनिवारच्या (ता. 16) तुलनेत अनेक ठिकाणी आज (रविवारी) सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून, येत्या काही दिवसांत सोने आणखी महाग होणार, हे निश्चित..

Advertisement

प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति एक ग्रॅम)

  • दिल्ली – 4,955 रुपये
  • मुंबई – 4,955 रुपये
  • पुणे – 4,958 रुपये
  • नागपूर – 4,958 रुपये

अमेरिकेतील महागाई, तसेच रशिया-युक्रेनमधील युद्ध संपायचं नाव नाही. त्यामुळे भविष्यात सोन्याचा भाव वाढू शकतो. भारतीय बाजारात ‘एमसीएक्स’वर सोन्याचा भाव 53,500 ते 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत (Gold Price Today) पोहोचू शकतात, असं कमॉडिटी मार्केटमधील जाणकारांचे मत आहे..

Advertisement

सोन्याच्या दरात गेल्या वर्षभरात तेजी दिसून आली. सोन्याचे दर 12 टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीत एक वर्षापूर्वी 24 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,890 रुपये होती. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,450 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. भविष्यात हे दर 55 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement