SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे वाढले ‘सीएनजी-पीएनजी’चे दर; परिस्थिती आणखी गंभीर होणार..?

पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांचा कल ‘सीएनजी’ वाहनांकडे वाढला.. मात्र, आता ‘सीएनजी’च्या दरातही वाढ होत असल्याचे पाहायला मिळतेय.. 2022 मध्येच ‘सीएनजी’च्या किमतीत 60 टक्के, म्हणजेच 28 रुपये प्रति किलो वाढ झाली. दुसरीकडे, त्याच वेळी ‘पीएनजी’च्या किमतीत सुमारे 33 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने गेल्या वर्षभरापासून शहर गॅस वितरण (CGD) क्षेत्राला घरगुती क्षेत्रातून नैसर्गिक वायूचे नवीन वाटप केलेलं नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्याही कपातीशिवाय ‘सीजीडी’ला 100 टक्के गॅस पुरवठ्याला मंजुरी दिली आहे. सोबतच नैसर्गिक वायूच्या किमतीही दुपटीने वाढल्याचे समोर आलंय.

Advertisement

मार्च-2021च्या मागणीच्या आधारे, पेट्रोलियम मंत्रालय सध्या शहर गॅस वितरकांना नैसर्गिक वायूचे वाटप करतंय. तथापि, दोन महिन्यांच्या सरासरी मागणीनुसार गॅस पुरवठा करण्याची विनंती ‘सीजीडी’ने केली आहे. मंत्रालय 6 महिन्यांच्या सरासरी मागणीनुसार पुरवठा करतंय. असं असताना एक वर्ष जुनी मागणी लक्षात घेऊन घरगुती क्षेत्रातून गॅसपुरवठा केला जातोय.

कशामुळे दरवाढ..?

Advertisement

सरकार शहर गॅस वितरणासाठी नवीन पाइपलाईन टाकत असल्याने ‘सीएनजी’ व ‘पीएनजी’च्या मागणीत वाढ झालीय. घरगुती गॅस फील्डच्या मागणीनुसार, नवीन वाटप न मिळाल्याने शहर गॅस वितरकांना गॅस आयात करावा लागेल. मात्र, लिक्विड नैसर्गिक वायू (LNG)चे दर देशांतर्गत दरांपेक्षा सहा पट आहेत. त्यामुळेच ‘सीएनजी’-‘पीएनजी’च्या किमती वाढत आहेत.

‘सीजीडी’ला घरगुती क्षेत्रातून नैसर्गिक वायूचे नवीन वाटप लवकर झाले नाही, तर ‘सीएनजी’-‘पीएनजी’चे दर आणखी वाढतील.. नि परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.. त्यात ‘एपीएम’ गॅसची किंमत प्रति युनिट 2.90 डॉलरवरुन 6.10 डॉलरपर्यंत सरकारनं वाढवलीय. त्यामुळे एकाच वेळी गॅसच्या किमती 110 टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement