SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चाणक्य नीति : आयुष्यात ‘या’ चुका कधीच करू नका; ज्ञान, धन, कुटुंबाचा होतो नाश..!

आचार्य चाणक्य यांनी आपल्या ‘चाणक्य नीति’ या ग्रंथातून चांगलं जीवन कसं जगावं, हे सांगितलंय.. जीवनात अशा काही चुका होतात, की ज्यामुळे आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येते.. ‘चाणक्य नीति’ अशा चूकांपासून सावध राहायला शिकवते, जेणेकरून व्यक्ती जीवनात येणाऱ्या असंख्य संकटांपासून वाचू शकते.

‘चाणक्य नीति’मध्ये अशाच काही चुका सांगितल्या आहेत, ज्या टाळले पाहिजे, अन्यथा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.. संपत्ती, कुटुंब, सौंदर्य, सन्मान सारं काही नष्ट होऊ शकतं… चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘या’ चुका कधीच करू नका..

  • ‘चाणक्य नीति’नुसार, माणूस कितीही ज्ञानी असला, तरी त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल, तर असे ज्ञान व्यर्थ आहे. शिक्षणाचा योग्य उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा माणसाला त्याचे ध्येय कळते, हे ध्येय साध्य करण्यासाठी तो योग्य मार्गावर चालतो.
  • शरीराने माणूस कितीही सुंदर आणि निरोगी असला, तरी वाईट सवयी असल्यास सुंदर असणंही व्यर्थ ठरतं. माणसाचे शरीर, मन आणि आचरण हे सर्व चांगलं असेल, तेव्हाच ते खरं सौंदर्य असते..
  • जर एखादी व्यक्ती दुष्ट असेल, दुष्कृत्य करुन इतरांना फसवित असेल, तर तो आपल्याच कुळाचा शत्रू बनतो. त्यामुळे त्याचे कुटुंब दुखावलं जातंच, पण समाजातील मान-प्रतिष्ठाही गमावून बसते.

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या संपत्तीचा उपभोग घेतला जात नाही, जे दानही केलं जात नाही, त्या धनाचा नाश होतो. तुमच्या पैशांचा चांगला वापर करायचा असेल, तर स्वतःवर, तुमच्या कुटुंबावर खर्च करा. तसेच त्याचा वापर गरजूंना मदत करण्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी करा.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement