SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अ‍ॅप डाऊनलोड करताच खात्यातून 1 मिनिटात 59 हजार लंपास; बघा, कशी केली जातेय फसवणूक

मुंबई :

कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. देशात एकीकडे डिजीटल व्यवहारात वाढ होत असताना दुसरीकडे ऑनलाईन फायनेंशियल फ्रॉडची (Online Financial Fraud) प्रकरणंही वाढली आहेत. कोरोना काळात हे प्रमाण अधिकच वाढलं आहे. देशातील सरकार आणि बँका यांच्याकडून लागोपाठ लोकांना अलर्ट राहण्याची सूचना वेळोवेळी करता येते. कोणीही अशा फ्रॉडचा बळी होऊ नये म्हणून सावधान राहण्याचा इशारा दिला जातो. अशीच एक ऑनलाईन फ्रॉडची घटना समोर आली आहे, जी पाहून तुम्ही हादरून जाल.

Advertisement

अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतगर्त रहिवासी असलेल्या पेंशनधारक शैलेजा मंगेश फडणीस (वय 62 राहणार, भागवत प्लॉट, अकोला.) यांना एक मॅसेज आला. तुमचे सीमकार्ड बंद होणार आहे, तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड करा असं केल्यानंतर महिलेच्या खात्यातून लागलीच 59 हजार रुपये परस्पर काढण्यात आले.

यांना 30 मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर सीमकार्ड ब्लॉक होईल, असा मॅसेज आला. तेव्हा मॅसेजमधील कस्टमर केअर नंबरवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पेटीएम, क्वीक सपोर्ट व बीएसएनएल, एनी डेस्क हे डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या एसीबीआयच्या पेंशन खात्यातून 59 हजार रुपये काढून फसवणूक केली आहे. आता रामदासपेठ पोलिसांत या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अनेकदा असे होते की, 50 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर झाले, सरकार आरोग्य मंत्रालयातर्फे 50 जीबी मोफत इंटरनेट, अशा प्रकारचे अनेक मॅसेज आपल्या मोबाईलवर पाठवले जातात. त्यासोबत एखादी लिंक दिली जाते. डाऊनलोड करायला सांगून त्यात आपले बँक खात्यासह आधार, पॅन कार्डची माहितीही भरायला सांगितली जाते. लोक फसतात अन् फ्रॉड करणारे त्यांचं अकाउंट रिकामं करतात. त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा.

Advertisement