SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): प्रत्येक कार्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठापासून संभाळून राहावे लागेल. मौज-मजा तसेच सहली यासाठी खर्च होईल. भाऊ-बहिणींकडून चांगले आशीर्वाद मिळतील. प्रलंबित कामं पूर्ण होतील.आवडत्या व्यक्तीबरोबर सुखद क्षण अनुभवाल. मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. शब्द जपून वापरणे. वाद टाळणे हिताचे. परिस्थितीची जाणीव ठेवा.

वृषभ (Taurus): मित्रांबरोबर पर्यटन स्थळाला भेट द्याल. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल.वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. फार काळजी करत राहू नका. प्रवासात काळजी घ्यावी. अनावश्यक प्रवास टाळा.

Advertisement

मिथुन (Gemini) : आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. मधुर वाणी इतरांच्या मनावर सकारात्मक छाप पाडेल. तुमच्या कार्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळेल. धनलाभ होईल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांमुळे त्रास जाणवेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. अधिकारी व्यक्तींची मदत होईल.

कर्क (Cancer) : प्रवासात धावपळ करावी लागेल. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. काही अत्यावश्यक खर्च होतील. कामे मार्गी लागतील. आज नोकरदार लोकांना कोणतेही विशेष काम यश मिळवून देऊ शकते. कठोर परिश्रम आणि नशिबाने तुम्हाला सर्वोत्तम असेल ते मिळेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील. मैत्री अधिक घट्ट होईल.

Advertisement

सिंह (Leo) : नोकरीत सामान्य परिस्थिती राहिल. पूजाअर्चा करण्याकडे ओढा राहिल. थोडा थकवा जाणवेल. गृहमानाची उत्तम साथ राहिल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल. कलेतून नावलौकिक वाढेल. घरातील साफसफाई काढाल. बाहेरचे खाणे टाळा. आवश्यक असल्यास विश्रांती घ्या.

कन्या (Virgo) : मनासारखे यश मिळेल. नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजुने राहिल. मित्र, नातेवाईक, सहकारी यांची साथ मिळेल. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक काही लाभ होईल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल. कामाच्या वातावरण मानवेल. नीटनेटकेपणाकडे अधिक लक्ष द्याल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. अडचणी दूर होतील. परिस्थितीतून मार्ग काढा.

Advertisement

तुळ (Libra) : वडिलधाऱ्या मंडळीचे मार्गदर्शन उपलब्ध ठरेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. कामात उत्साह राहिल. व्यवसायात स्पर्धक आव्हान उभं करतील. जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. अतिरेक टाळा. दुसऱ्यांच्या आनंदाचा जास्त विचार कराल.

वृश्‍चिक (Scorpio) : थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत महत्वाच्या प्रकल्पात सहभागी व्हावे लागेल. नोकरीचे प्रयत्न करत असाल तर चांगली संधी मिळेल. दिवस शुभ आहे. कौटुंबिक सुख चांगले राहील. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. अपयशाने खचून जाऊ नये. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. अतिविचार करू नका.

Advertisement

धनु (Sagittarius) : जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. वावविवाद टाळणे योग्य ठरेल. नवीन योजनांची आखणी करा. प्रवासात नवीन ओळखी होतील. नवीन बिझनेस प्लॅनवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

मकर (Capricorn) : कायद्याची बंधने पाळा, मनासारखी अर्थप्राप्ती होईल. जोडीदाराशी सूर जुळतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहिल. आज आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. यावेळी संसाधनांच्या कमतरतेमुळे काही व्यवसाय योजना थांबवाव्या लागतील. नवीन लोक संपर्कात येतील. प्रगती कराल. दिवस चांगला जाईल. आर्थिक प्रगती होईल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : कामाचा व्याप वाढताना तारेवरची कसरत करावी लागेल. आर्थिक आवक चांगली राहिल. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबत आनंदात वेळ जाईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. तिरसटपणे वागू नये. चुणूक दाखवता येईल. स्वतःला वेळ द्याल. चिंतन कराल आणि चुका सुधाराल.

मीन (Pisces) : थोडे विचार करुन निर्णय घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. तब्येतीकडे लक्ष द्या. पथ्य पाळणे आवश्यक आहे. प्रवास घडून येतील. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. इतरांसोबत मिळून केलेल्या कामात चांगला फायदा होईल. व्यापारी वर्गाला नवीन आशादायी वातावरण लाभेल. लिखाणाला बळ मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसेल.

Advertisement