SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रस्त्याकडेचे आंबे घेताना ‘ही’ घ्या काळजी; अन्यथा…

सध्या फळांचा राजा ‘आंबा’ आता आपले गोडवा वाटण्यासाठी तयार झाला आहे. आंब्याच्या या सिझनमध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळे आंब्यावर तुटून पडतात. कधी कधी आंब्यांचे शोर्टेज पडते तेव्हा तर लोकं अगदी अव्वाच्या सव्वा पैसे मोजून आंबे विकत घेतात. मात्र हा आंबा (Alphonso Mango) खरेदी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

कधी कधी तर आंबे स्वस्त मिळतात म्हणून बऱ्याचदा रस्त्याकडेला पथारीधारकांकडे किंवा टेम्पोतून विक्रीसाठी आणलेला आंबा आपण विकत घेतो. मात्र घेताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. कारण आंबा लवकर पिकावा आणि चांगला दिसावा म्हणून त्यावर जास्त प्रमाणात रसायनांचा वापर केला जातो.

Advertisement

असा ओळखा रसायनयुक्‍त आंबा :- 

  • आंबा घेताना तो वजनदार लागला पाहिजे. रासायनिक प्रक्रिया केलेला आंबा वजानाने हलका असतो.
  • देठाचा थोडा भाग असलेला आंबा खरेदी करावा. तसेच त्या देठावर पांढरी बुरशी दिसली किंवा छिद्र दिसली तर तो आंबा विकत घेऊ नये
  • रसायनात पिकलेला आंबा वरून पिवळाधमक दिसतो. आतून अर्धा कच्चाच असतो. त्यातील गर पिकत नाही. रसायनातून निघणाऱ्या विशिष्ट वायू आणि उष्णतेमुळे आंब्याचा फक्त रंग बदलतो. अनेकदा उग्र वास येतो. असे आंबे खरेदी करू नयेत. अशा आंब्याचे सेवन केल्यास अपचन, ऍसिडिटी असे आजार होण्याची शक्‍यता असते.
  • आंबा पिवळाधमक दिसावा, असा आपला समज आहे. तो आधी मनातून काढून राकावा. थोडासा हिरवट असलेला पण झाडावरच पिकलेला, पण आतून केशरी असणारा आंबा उत्तम दर्जाचा असतो. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेऊनच आंबा खरेदी करावा.
  • आपल्याकडे सध्या मिळणाऱ्या रत्नागिरी, देवगड हापूसमध्ये काही किरकोळ व्यापारी केरळ, कर्नाटक आणि विशेषत: चेन्नईचा आंबा मिसळतात. तो दिसायला आपल्या हापूससारखा असला, तरी ती मधूरता आणि गोडवा त्या फळात नसतो. कमी दर्जाची 2-3 फळं डझनाच्या पेटीत सहज मिसळतात.

Advertisement