SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कलिंगड निवडताना अडचण होत आहे? हे वाचा आणि निवडा रसाळ आणि चविष्ट कलिंगड

उन्हाळ्यात जीवाला गारवा देणारे फळ म्हणजे कलिंगड. भर उन्हात प्रवास करून या आणि कलिंगड खा. मन आणि पोट दोन्हीही तृप्त होईल. पण बऱ्याचदा आपण कलिंगड घेऊन घरी जातो. आधीच तोंडाला पाणी सुटलेले असते आणि कलिंगड चांगले निघत नाही. गोड लागत नाही मग मोठा भ्रमनिरास होतो. त्यामुळे आज आम्ही चविष्ट व रसाळ कलिंगड कसे निवडावे हे सांगणार आहोत.

काही थोर लोक असे असतात जे कलिंगड निवडताना कलिंगडावर बुक्की मारतात. काही जण वास घेतात आणि एवढे करूनही कलिंगड गोड, रसाळ निघेल याची अजिबात खात्री नसते.

Advertisement

असे निवडा कलिंगड :- 

  • कलिंगड हे कधीच संपूर्ण हिरवे नसते. त्यावर कुठे गडद तर कुठे फिक्कट असे डाग असतात. जो फिक्कट असतो तो पिवळसर दिसतो. हा दिसायला हवा.
  • जर हा पिवळसर ठिपका दिसत नसेल तर समजून जा की हे कलिंगड वेळेआधी तोडले आहे. तसेच जर ते अधिक गडद असेल तर ते वेलीवर गरजेपेक्षा जास्त वेळ राहिले आहे असे समजावे.
  • तसेच हा भाग पांढरा असेल तर कलिंगड तयार नाही असे समजा.
  • कलिंगडाचे देठ पूर्ण वाळलेले असेल तर ते कलिंगड खाण्यास तयार असल्याचे ओळखावे.
  • कलिंगडावर वेगवेगळ्या रेषा असतात. त्यावर रेषा जेवढ्या जास्त तेवढे ते गोड असते. तसेच कलिंगड फार मोठे किंवा फार छोटे घेऊ नये. मध्यम आकाराचे घ्यावे.

 

Advertisement

हे उपाय ट्राय करुन छान चवदार कलिंगड खरेदी करुन उन्हाळ्यात मस्त कलिंगडावर ताव मारा.

Advertisement