SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इलेक्ट्रिक गाडीसाठी बजेट कमी पडतंय..? ‘या’ बॅंकेनं दिलीय खास ऑफर..!

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना दहा वेळा पेट्रोलचा विचार मनात येतो.. सततच्या इंधन दरवाढीमुळं नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे.. सरकारही त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे पाहायला मिळते..

पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा खर्च कमी येतो. शिवाय, त्यातून प्रदूषणही कमी होते.. मात्र, त्यात अडचण एकच.. ती म्हणजे, इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती अफाट आहेत. तुमचाही इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार असेल नि त्यासाठी बजेट कमी पडत असेल, तर ‘नो टेन्शन’.. अनेक बॅंका त्यासाठी तुमच्या मदतीला आहेतच की…

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेकडून अशीच एक ऑफर ग्राहकांना देण्यात येत आहे. या ऑफरमुळे तुमचे इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.. चला तर मग या बॅंकेच्या खास ऑफरबाबत जाणून घेऊ या..

‘एसबीआय’च्या ऑफरबाबत..
इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एसबीआय’ने देशात पहिल्यांदाच ‘ग्रीन कार कर्ज’ सुरू केलंय. हे कर्ज सध्याच्या कार लोनच्या व्याज दरापेक्षा 20 बेसिक पॉइंट कमी आहे. ऑन-रोड किमतीच्या 90 ते 100 टक्के लोन निवडक मॉडेल्सवर उपलब्ध दिले जाते. ‘ग्रीन कार कर्जा’चे व्याज दर 7.05 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत आहेत.

Advertisement

कर्जासाठी संपूर्ण प्रोसेसिंग फीदेखील माफ करण्यात येणार आहे. तुम्हाला कमीत कमी ‘ईएमआय’चे हफ्ते भरायचे असतील, तर बँक तुम्हाला 8 वर्षांत संपूर्ण कर्जफेडीची सुविधा उपलब्ध करून देते.

तुम्ही लवकर ईएमआयचे हफ्ते भरले, तर कर्जावरील व्याजात बचत होऊ शकते. तुम्ही 8 वर्षांपूर्वीही बँकेचे संपूर्ण लोन फेडू शकता.

Advertisement

लोनसाठी अटी..

  • ‘एसबीआय’कडून इलेक्ट्रिक वाहनावर लोन घेण्यासाठी संबंधित कर्जदाराचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 67 वर्षांपर्यंत असावे.
  • व्यावसायिक, सरकारी कर्मचारी किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ऑफरचा लाभ होणार आहे..
  • थोडक्यात, तुमचा पगार हा बँकेच्या नियमात बसायला हवा, तरच तुम्हाला लोन मिळू शकते.
  • ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांवर आहे, असे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • बँकेने विचारणा केलेल्या आवश्यक डॉक्युमेंटची पुर्तता केल्यानंतर तुम्हाला इलक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कर्ज मिळू शकते.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement