SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रद्द करा; ‘त्या’ पक्षाध्यक्षांची मागणी

कोल्हापूर :

राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिलला मतदान झाले. आज मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल लागेल. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे सर्वच महत्वाचे नेते कोल्हापुरात तळ ठोकून होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील द्वंद्वामुळे रंगतदार ठरलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayshri Jadhav) यांनी भरभक्कम आघाडी घेतल्याचे चित्र आहे.  मात्र आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

Advertisement

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूकद्द करण्यात यावी अशी मागणी शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्ष करुणा शर्मा यांनी केली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यानं ही निवडणूक रद्द करण्यात यावी, जर ती रद्द झाली नाही तर आपण सुप्रीम कोर्टापर्यंतजाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

का केली त्यांनी अशी मागणी :-

Advertisement

10 तारखेलाच इथं आचारसंहिता संपली होती. तरीही काँग्रेस आणि भाजपनं आपापल्या मोठ्या वर्तमानपत्रात जाहिरात आणि प्रचाराच्या बातम्या दिल्या आहेत. त्याचबरोबर या पक्षांचे लोक इथं पैसे वाटताना पकडले गेले आहेत. याशिवाय इथं काँग्रेस आणि भाजपकडून ४० लाखांहून अधिक खर्चही झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement