SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार, ‘या’ बड्या नेत्याचा केला पराभव..

राज्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे.  जयश्री जाधव यांना 96 हजार 226 मते पडली आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांना (77,426 मते) पराभवाची धूळ चारली आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरस निर्माण झाली होती.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीचा निकाल:

Advertisement

पहिल्या फेरीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कॉंग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या जयश्री जाधव 4856 मतं मिळवून 2137 मतांनी आघाडीवर होत्या तर भाजपच्या सत्यजीत कदम याना 2719 मतं मिळाली. 10 व्या फेरीत जयश्री जाधव या 8073 मतांनी आघाडीवर होत्या. यासोबतच 15 व्या फेरीमध्ये जयश्री जाधव 13 हजार 998 मतांनी आघाडीवर होत्या.

विजयाकडे वाटचाल करत जाधव कुटुंबीय भावूक होताना दिसलं. अखेरच्या काही फेऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर 20व्या फेरीत जयश्री जाधव तब्बल 15 हजार 432 मतांनी आघाडीवर होत्या. तर चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 18 हजार 838 इतके मताधिक्य मिळाले. 26व्या फेरीत जयश्री जाधव यांना 96,226 मते मिळाली असून, भाजपच्या सत्यजित कदम यांना 77,426 मते मिळाली.

Advertisement

”आज पप्पा हे बघायला हवे होते…”

कोल्हापूरकरांचे प्रेम पाहून जयश्री जाधवांच्या कन्या हा मोठा विजय पाहून भारावून गेल्या आणि त्यांचे अश्रू थांबले नाही. त्यांना त्यांचे दिवंगत वडील चंद्रकांत जाधव यांची आठवण झाली आणि आज पप्पा हा विजय पाहायला येथे हवे होते, असे त्यांनी उद्गार काढत आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असता मोठ्या फरकाने त्यांनी आज हा विजय मिळवला आहे.

Advertisement

अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया केल्या व्यक्त, वाचा:

👉 कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. मविआ मधील सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. कोल्हापूरच्या जनेतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले – आमदार जयश्री जाधव.

Advertisement

👉 फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा विजय! कोल्हापूर ची जागा जिंकली, शाहू महाराज की जय..! – मंत्री जितेंद्र आव्हाड

👉 हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीचा विजय – नेते नाना पटोले

Advertisement

👉 कोल्हापूरचा विचार समतेचा, प्रबोधनाचा..! कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे…! – मंत्री बाळासाहेब थोरात
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement